धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना; एकनाथ शिंदेंनी दाखवला कायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:41 PM2022-06-23T22:41:30+5:302022-06-23T22:42:07+5:30

शिवसेनेनं १२ आमदारांच्या निलंबनातची मागणी केली होती. संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी - एकनाथ शिंदे

eknath shinde targets shiv sena leaders 12 mla maharashtra political crisis uddhav thackeray | धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना; एकनाथ शिंदेंनी दाखवला कायदा!

धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना; एकनाथ शिंदेंनी दाखवला कायदा!

Next

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडूनही एक खेळी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार किंवा तो गट पक्षादेशाचं उल्लंघन करत असून त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली होती. त्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली. शिवसेनेनं १२ आमदारांच्या निलंबनातची मागणी केली होती. दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदे यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर देत अशा धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचं म्हटलं.

“कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आहे. १२ आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत, असंही ते म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला.


कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या १० व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Web Title: eknath shinde targets shiv sena leaders 12 mla maharashtra political crisis uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.