Eknath Shinde : "आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही"; आनंद दिघेंचं नाव घेत एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:46 PM2022-06-21T14:46:37+5:302022-06-21T14:54:31+5:30

Eknath Shinde Tweet : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

Eknath Shinde Tweet Over Political Situation | Eknath Shinde : "आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही"; आनंद दिघेंचं नाव घेत एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

Eknath Shinde : "आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही"; आनंद दिघेंचं नाव घेत एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

googlenewsNext

मुंबई - शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, परंतू ठाण्यातील त्यांचे खास पदाधिकारीदेखील सुरतला गेले आहेत. याच दरम्यान आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही" असं म्हणत शिंदेंनी सूचक ट्विट केलं आहे. 

"आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही" असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुढील २२ आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
महाडचे आमदार भरतशेठ गोगावले
आटपाडीचे आमदार अनिल बाबर
भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे
पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील
मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड
अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर

दरम्यान, शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. या आमदारांनी शिवसेना भाजपासोबत गेल्यास आम्ही तुमच्यासोबत राहू असेही म्हटल्याचे समोर येत आहे. शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी मिळत नाही, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामांना हा निधी दिला जातो. यावेळी आमदारांना विश्वासातही घेतले जात नाही. याच्या तक्रारी उद्धव ठाकरेंकडे केल्यावर त्याची दखलही घेतली जात नाही, अशा तक्रारी शिवसेना आमदारांच्या होत्या. या साऱ्या वातावरणातच राज्यसभेला शिवसेनाचा उमेदवार पडला, याची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Eknath Shinde Tweet Over Political Situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.