Eknath Shinde Tweet : भाजपाच्या सरकारमध्ये किती अन् कोणती मंत्रिपदे? एकनाथ शिंदेंनी केलं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:21 AM2022-06-30T11:21:57+5:302022-06-30T11:24:30+5:30

Eknath Shinde Tweet reveals how many and which ministry Shinde Group will be getting in BJP Devendra Fadnavis Government : एकनाथ शिंदे भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देणार हे त्यांनी स्पष्टपणे सागितलं.

Eknath Shinde Tweet reveals how many and which ministry Shinde Group will be getting in BJP Devendra Fadnavis Government  | Eknath Shinde Tweet : भाजपाच्या सरकारमध्ये किती अन् कोणती मंत्रिपदे? एकनाथ शिंदेंनी केलं ट्वीट

Eknath Shinde Tweet : भाजपाच्या सरकारमध्ये किती अन् कोणती मंत्रिपदे? एकनाथ शिंदेंनी केलं ट्वीट

googlenewsNext

Eknath Shinde BJP Devendra Fadanvis: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीची साथ सोडत बंड केले. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजपासोबत सरकार स्थापन करावे असा प्रस्ताव एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवला होता. पण, तुम्ही मुंबईत या आणि चर्चा करा असे उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात आले. या साऱ्या गोंधळानंतर अखेर बरेच दिवस काहीच निर्णय न झाल्याने राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळले. आता नव्याने अस्तित्वात येणारे सरकार फडणवीस-शिंदे यांचे असेल अशी चर्चा आहे. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली.

"भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस", असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले.

दरम्यान, आज भाजपा सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. तसेच, पुढच्या एक ते दोन दिवसात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण असणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवणार अशी शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे गटातील १३ ते १४ जणांना संधी मिळू शकते, असेही म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते, अशी शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. पण एकनाथ शिंदे यांनी मात्र या साऱ्या अफवा असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Eknath Shinde Tweet reveals how many and which ministry Shinde Group will be getting in BJP Devendra Fadnavis Government 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.