Eknath Shinde Vs. Shiv Sena Live: एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत काय ठरलं?, सर्व आमदार एकजुटीनं म्हणाले...

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:44 AM2022-06-23T11:44:45+5:302022-06-23T16:05:41+5:30

Eknath Shinde Vs. Shiv Sena Live: शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडी सरकार ...

eknath shinde vs shiv sena the rebel mla join shinde camps maharashtra politiclal crisis sanjay raut uddhav thackeray Live updates | Eknath Shinde Vs. Shiv Sena Live: एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत काय ठरलं?, सर्व आमदार एकजुटीनं म्हणाले...

Eknath Shinde Vs. Shiv Sena Live: एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत काय ठरलं?, सर्व आमदार एकजुटीनं म्हणाले...

Next

Eknath Shinde Vs. Shiv Sena Live: शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं असून शिंदे समर्थक आमदार आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्री गाठलं आहे. त्यामुळे पक्षाचे प्रमुख म्हणून आता मातोश्रीवरुन कोणत्या हालचाली होणार आणि कोणते निर्णय घेतले जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दिवसभरातील या सर्व राजकीय घडामोडींचे अपडेट्स...

Eknath Shinde Vs. Shiv Sena Live Updates:

LIVE

Get Latest Updates

04:05 PM

एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत काय ठरलं?

रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक संपली, या बैठकीत सर्व आमदारांनी मिळून शिंदेंसोबतच पुढचा लढा द्यायचा असा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

03:03 PM

शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार आमच्या संपर्कात, मुंबईत आल्यावर ते शिवसेनेत असतील, संजय राऊतांचा दावा

02:51 PM

२४ तासांत परत या मविआमधून बाहेर पडण्याचा विचार करू- संजय राऊत

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना जर असं वाटत असेल की शिवसेनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, तर त्यांनी २४ तासांत मुंबईत यावं आणि आपली मागणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडावी, त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल- संजय राऊत

01:35 PM

१८ आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत, शिवसेनेचा नवा दावा!

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला असताना आता शिवसेनेचे १८ आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

12:35 PM

रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं

गुवाहाटीमध्ये ज्या ठिकाणी शिंदे समर्थक आमदार आहेत त्या रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

12:32 PM

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

"अडीच वर्ष शिवसेनेच्या आमदाराला वर्षाची दारं बंद होती. जेव्हा आम्हाला प्रवेश मिळत नव्हता तेव्हा राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक तुम्हाला सहज भेटत होते. त्यावेळी लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?", संजय शिरसाट यांचा पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट सवाल 

12:15 PM

उद्धव ठाकरेंना संकटात जी मदत लागेल ती करणार- जयंत पाटील

"आमदार गेले नसून पाठवण्यात आलेत यावर मी बोलणार नाही. शिवसेनेच्या अंतर्गत काय चाललंय ते माहित नाही. उद्धव ठाकरेंची काल आम्ही भेट घेतली. त्यांना या संकटात जी मदत लागेल ते सर्व मदत करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे", जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

12:14 PM

राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे आमदार परत येतील- जयंत पाटील

"सर्वांनी एकमुखाने उद्धव ठाकरेंसोबत राहावं. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. राज्याबाहेर गेलेले शिवसैनिक आमदार परत येतील आणि पक्षातच राहतील आम्हाला विश्वास आहे. आमचा पूर्ण पाठिंबा कायम राहील", असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.  

12:11 PM

राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे आमदार परत येतील- जयंत पाटील

"सर्वांनी एकमुखाने उद्धव ठाकरेंसोबत राहावं. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. राज्याबाहेर गेलेले शिवसैनिक आमदार परत येतील आणि पक्षातच राहतील आम्हाला विश्वास आहे. आमचा पूर्ण पाठिंबा कायम राहील", असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

12:04 PM

राष्ट्रवादीच्या बैठकांचं सत्र

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची खलबतं सुरू आहेत. 

11:47 AM

उद्धव ठाकरेंकडून 'धनुष्यबाण'ही जाणार?

शिवसेनेचे दोन तृतीयांशहून अधिक आमदार आता शिंदे गटात सामील झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्याकडील आमदार हाच मूळ शिवसेना पक्ष असल्याचं सिद्ध करण्यसाठी कायदेशीर लढाई सुरू केली जाण्याची शक्यता आहे. यात धनुष्यबाण निशाणीसाठीचं पत्र एकनाथ शिंदे देणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Web Title: eknath shinde vs shiv sena the rebel mla join shinde camps maharashtra politiclal crisis sanjay raut uddhav thackeray Live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.