Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एक नाही दोन! ठाकरेंनी सांगितले सहा, निवडणूक आयोगाकडे गेले चारच; खासदार फुटले? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 02:11 PM2023-02-18T14:11:20+5:302023-02-18T14:12:03+5:30

निवडणूक आयोगाकडे गेलेल्या कागदपत्रांनुसार आयोगाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे बलाबल किती?

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena: One Not Two! Thackeray said six, only four went to Election Commission; MP split? | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एक नाही दोन! ठाकरेंनी सांगितले सहा, निवडणूक आयोगाकडे गेले चारच; खासदार फुटले? 

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एक नाही दोन! ठाकरेंनी सांगितले सहा, निवडणूक आयोगाकडे गेले चारच; खासदार फुटले? 

googlenewsNext

शिवसेनेचे एकूण १९ खासदार होते. एकनाथ शिंदेंनी जेव्हा ठाकरेंपासून फारकत घेतली तेव्हा शिंदेंसोबत यापैकी १२ खासदार गेले, तर १ खासदार नंतर गेले. यामुळे ठाकरे गटाने निवडणुक आयोगाला आपल्याकडे सहा खासदार असल्याचे सांगितले. मात्र, आयोगाच्या कागदपत्रांवरून प्रत्यक्षात ठाकरे गटाचे चारच खासदार असल्याचे दिसत आहे. 

Eknath Shinde Shivsena: तो १४ वा खासदार कोण? होता ठाकरे सेनेत पण शिंदेंना 'रसद' पुरवत होता

ठाकरे गटाच्या एका खासदाराने ठाकरे गटात राहून शिंदेंना प्रतिज्ञापत्र दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आधीच ठाकरे गटाला धक्के बसत असताना आता आणखी एक खासदार 'बेपत्ता' झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे हे दोन खासदारही तळ्यात मळ्यात होण्याची वाट पाहत होते, की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

निवडणूक आयोगाकडे गेलेल्या कागदपत्रांनुसार आयोगाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे बलाबल किती याची माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये शिंदे गटाकडे विधानसभेत ५५ पैकी ४० आमदार आहेत. तर ठाकरे गटाकडे ५५ पैकी १५ आमदार आहेत. तर विधान परिषदेचे शिंदेंकडे शून्य आणि ठाकरेंकडे १२ पैकी १२ आमदार आहेत. 

दुसरीकडे लोकसभेत १९ खासदारांपैकी शिंदे गटाकडे १३ आणि ठाकरे गटाकडे ४ खासदार आहेत. ठाकरे गटाने सहा खासदार असल्याचा दावा केला होता. परंतू आयोगाकडे ४ खासदारांचीच प्रतिज्ञापत्रे आली आहेत. यामुळे दोन खासदार तटस्थ राहिले की ते देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे. राज्यसभेत मात्र शिंदे गटाकडे एकही खासदार नाहीय. तिकडे तीनपैकी तीन खासदार हे ठाकरे गटाकडे आहेत. 

Web Title: Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena: One Not Two! Thackeray said six, only four went to Election Commission; MP split?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.