शेतक-यांवर कुठलाही अन्याय होणार नाही: एकनाथ शिंदे
By admin | Published: July 13, 2017 08:43 PM2017-07-13T20:43:05+5:302017-07-13T20:43:05+5:30
महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळणार आहे. या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सर्व शेतक-यांना
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 13 - महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळणार आहे. या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सर्व शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येईल. कुठल्याही शेतकºयावर अन्याय होणार नाही व २ आॅक्टोबरपर्यंत १०० टक्के ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. समृद्धी महामागार्साठी थेट जमीन खरेदीचा शुभारंभ आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून झाला. या निमित्ताने नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धीमार्ग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील दहा जिल्ह्यांना जोडणार असून या महामार्गावरुन २६ तालुके हे विकास मार्गावर येणार आहेत. महामार्गासाठी आवश्यक असणारी जमीन बाजारमूल्यापेक्षा ५ पट मोबदला देऊन खरेदी करण्यात येणार आहे. शिवाय जमिनीवरील विहीरी, बांधकाम यांचादेखील योग्य मोबदला देण्यात येईल. आतापर्यंत ३९२ गावांपैकी ३७१ गावांमध्ये जमीनीची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांमध्ये जमीनीच्या मोजणीसाठी विरोध आहे. या गावांतील शेतकºयांशी शासनातर्फे संवाद साधण्यात येणार असून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंच्याच निर्देशांचे पालन
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांची बाजू घेतली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला त्यांचा विरोध नाही. मात्र एकाही शेतकºयावर अन्याय व्हायला नको, अशी त्यांची स्पष्ट भुमिका आहे. त्यांच्या निर्देशांचेच पालन होत असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती शेतकºयांकडून येणाºया सूचनांवर विचार करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
‘मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे’ची क्षमतावाढ
‘मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे’वर वर्दळ वाढली असून अनेकदा येथे वाहतूकीची कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन या मार्गाची क्षमता वाढ करण्यात येणार आहे. याअंतर्गत ८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार असून येथून हलकी वाहने जाऊ शकतील. यासंदर्भात निविदी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
५ ठिकाणी विमान उतरण्याची सुविधा
समृद्धी महामार्ग बांधत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शेतकºयांसाठी २४ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येतील. तसेच ५ ठिकाणी ‘इमर्जन्सी’मध्ये विमान उतरु शकतील, अशी सुविधा राहणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.