Eknath Shinde: भाजपाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करणार का? एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 09:04 AM2022-06-22T09:04:10+5:302022-06-22T09:04:48+5:30

Eknath Shinde: शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यानंतर काल संपूर्ण दिवसभर मौन बाळगणारे एकनाथ शिंदे यांनी आज पहाटेपासून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

Eknath Shinde: Will you form a government by supporting BJP? Eknath Shinde's big statement | Eknath Shinde: भाजपाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करणार का? एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Eknath Shinde: भाजपाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करणार का? एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

googlenewsNext

गुवाहाटी - शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यानंतर काल संपूर्ण दिवसभर मौन बाळगणारे एकनाथ शिंदे यांनी आज पहाटेपासून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर भाजपाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. 
आज दुपारी तुम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपाला पाठिंबा देणारं पत्र  राज्यपालांना देणार आहात का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले की, अद्याप असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही ४० प्लस आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 
तसेच आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व त्यांची भूमिका त्यांची विचारधारा सर्वसामान्य शिवसैनिकांची भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही. धर्मवीर आनंद दिघेंनी दिलेली शिकवण, तसेच बाळासाहेबांचं हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामान्य जनतेची भावना घेऊन पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले.  
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आज बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार एकत्र आलेलो आहोत. आम्ही कुणावरही कसलीही टीकाटिप्पणी केलेली नाही. त्यामुळे मी एकच सांगतो की, विकासाचं राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे न्यायचं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 
दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांच्या फोटोमध्ये तब्बल ३५ हून अधिक आमदार दिसत आहेत. तर आसाममध्ये पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Web Title: Eknath Shinde: Will you form a government by supporting BJP? Eknath Shinde's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.