मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आमदारांसह ठाण्यात; शक्ती स्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 10:37 PM2022-07-04T22:37:45+5:302022-07-04T22:40:02+5:30

बहुमत आमच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले आहे. यापुढील वाटचाल बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्यांचे विचार आणि विकासाचचे हिंदुत्व त्यानुसार राज्य सरकार या राज्याचा विकास करेल असा विश्वास त्यानी व्यकय केला.

Eknath Shinde with 50 MLAs at Shakti Sthal thane | मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आमदारांसह ठाण्यात; शक्ती स्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आमदारांसह ठाण्यात; शक्ती स्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तब्बल १५ दिवसांनी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शक्ती स्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंद नगर चेक नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर  आपल्या ५० समर्थक आमदारांसह ते थेट आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर दाखल झाले. स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिवादन करून हे सरकार हिंदुत्तवाचा विचार पुढे नेऊन सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचे कामकरेल असा विश्वास त्यांनी यावेळी पुन्हा एकदा व्यक्त केला. 

 मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच ठाण्यात आले. एकनाथ शिंदे हे दुपारी ४ पर्यंत ठाण्यात येतील यासाठी २ वाजल्यापासून एकनाथ शिंदे समर्थकांनी आनंद नगर चेक नाका आणि आनंद आश्रमात गर्दी केली होती. शहरात ठिकाणी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. संध्याकाळी ९.३० च्या सुमारास ५० आमदारांसह शक्ती स्थळावर दाखल झाले. एक मोठी बस आणि एकनाथ शिंदे यांचा ताफा शक्तीस्थळावर दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आला. यावेळी जोरदार घोसनबाजी करत त्यांचे स्वगत करण्यात आले, यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. एकनाथ लोकनाथ या गाण्याचा गजर यावेळी करण्यात आला. जय भवानी जय शिवाजी, एकनाथ शिंदे आगे बढो अशा घोषणा दिल्या.

 बहुमत आमच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले आहे. यापुढील वाटचाल बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्यांचे विचार आणि विकासाचचे हिंदुत्व त्यानुसार राज्य सरकार या राज्याचा विकास करेल असा विश्वास त्यानी व्यकय केला. सर्वसामान्य घटकांचा, शोषित,वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल, अनेक प्रकल्प आमचे सरकार करेल, राज्याचा विकास करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सहकारी यांना सोबत घेऊन युती सरकार भविष्याची वाटचाल करेल. हे गोरगरिबांच्या सर्वसामान्यांचे सरकार आहे, या सरकारमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं जाईल असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Eknath Shinde with 50 MLAs at Shakti Sthal thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.