Eknath Shinde's Dasara Melava: शिंदेंचा दसरा मेळावा! राज्यभरातून १० हजार बसेस मुंबईत येणार, ट्रेनही बुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 06:22 PM2022-09-22T18:22:16+5:302022-09-22T18:22:48+5:30
Eknath Shinde's Dasara Melava: एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य़कर्ते मुंबईत येणार असल्याने त्यांच्या राहण्याच्या, जेवण्याच्या सोईसाठी मुंबईतील मोठमोठे हॉल, हॉटेल बुक केली जात आहेत.
दसरा मेळावा कुठे होणार यावरून अद्याप निर्णय झालेला नसताना शिवसेना नेमकी कोणाची याचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी तयारी करत आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी जवळपास पाच लाखांवर लोक जमा करण्याची जबाबदारी त्यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
यामुळे राज्यभरातून १० हजार बसेस मुंबईत येण्याची शक्यता आहे. विशेष ट्रेनदेखील बुक करण्यात येत आहेत. राज्यभरातील चाळीस आमदार आपलेच दोन ते तीन हजार कार्यकर्ते गोळा करणार आहेत. याशिवाय जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी टार्गेट देण्यात आली आहेत.
जळगावमध्ये तीन ट्रेन बुक करण्यात आल्या आहेत. यासाठी आगाऊ दोन लाख रुपये प्रत्येक ट्रेनसाठी दिले आहेत. तसेच नाशिकमध्ये देखील शिवसेनेची बैठक सुरु आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या सभेची गर्दी नाही तर जनसंघाच्या सभेच्या गर्दीचा विक्रम मोडण्याची तयारी सुरु आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य़कर्ते मुंबईत येणार असल्याने त्यांच्या राहण्याच्या, जेवण्याच्या सोईसाठी मुंबईतील मोठमोठे हॉल, हॉटेल बुक केली जात आहेत. त्यांच्या मदतीसाठी कार्यकर्ते तयार केले जात आहेत. एवढ्या लोकांचे नियोजन करण्यासाठी खास लोकांवर शिंदे यांनी जबाबदारी सोपविली आहे. याबाबतची माहिती एबीपी माझाने दिली आहे.
कशासाठी...
शिंदे गटात जायचे की नाही, अशा काठावर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. यामुळे असे शक्तीप्रदर्शन केले तर त्याचाफायदा होईल आणि गटात पुन्हा इनकमिंग सुरु होईल, अशी रणनिती असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेना पक्षात जे काही कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत, त्यांना फोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.