'झोळी लटकवून निघून जाल...' उद्धव ठाकरेंच्या PM मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 03:31 PM2023-04-24T15:31:06+5:302023-04-24T15:32:20+5:30

काल पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती.

Eknath Shinde's strong response to Uddhav Thackeray's criticism on narendra modi | 'झोळी लटकवून निघून जाल...' उद्धव ठाकरेंच्या PM मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे जोरदार प्रत्युत्तर

'झोळी लटकवून निघून जाल...' उद्धव ठाकरेंच्या PM मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे जोरदार प्रत्युत्तर

googlenewsNext


मुंबई: काल(दि.23) जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. घराणेशाहीवर तुम्ही बोलता. मी फकीर आहे, असे सांगता. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा द्याल. म्हणूनच चांगले घराणे लागते, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला होता. 

उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युउत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर नेली आहे. आपल्याला जी20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. उद्धव ठाकरेंचे वक्तव्य हे वैयक्तिक द्वेशातून आले आहे. 

पंतप्रधानांच्या मातोश्रींचे निधन झाल्यावरही त्यांनी देशाला प्राधान्य दिले. त्यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध केली आहे. लोकप्रियतेची पोटदुखी निर्माण झाल्यावर अशा प्रकराचे वक्तव्य करण्याचे पाप काही लोक करतात. 25 वर्षे युतीत काम केले आणि आता भाजप नेत्याबाबत असे वक्तव्य निंदाजनक आहे. त्यांचे वक्तव्य ही बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती होऊ शकत नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी ते काय करू शकतात, हे त्यांनी दाखवलय, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.  
 

Web Title: Eknath Shinde's strong response to Uddhav Thackeray's criticism on narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.