२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 08:34 PM2024-04-19T20:34:39+5:302024-04-19T20:35:27+5:30
Prakash Ambedkar on Eknath Shinde: हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर घटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी मोदींविरोधात मतदान करा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
हिंगोली येथील वंचितचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण यांच्या प्रचारासाठी आंबेडकर आले होते. शिंदे आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून वाद सुरु आहेत. शिंदे यांचा म्हणावा तसा फायदा लोकसभेला न दिसल्यास विधानसभेला वेगळे चित्र दिसू शकते, अशा चर्चा आमदारांसह राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
मोदी पुन्हा सत्तेत आले तर घटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी मोदींविरोधात मतदान करा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे. २०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत. जो ऐकणार नाही त्याला तुरुंगात टाकले जाईल, असे आंबेडकर म्हणाले.
हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? असा सवाल करत आंबेडकर यांनी ज्यांची किमान मालमत्ता ५० कोटींची आहे अशी १७ लाख कुटुंबे देश सोडून गेली आहेत, असे सांगितले. मते मागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही. तुम्ही राज्य करताय की पिळवणूक अशी टीका आंबेडकर यांनी केली.