एकनाथ ठाकूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
By admin | Published: August 8, 2014 02:41 AM2014-08-08T02:41:36+5:302014-08-08T02:41:36+5:30
बँकिंग क्षेत्रतील दादा व्यक्तिमत्त्व व शिवसेना पक्षाचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचे राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 73 वर्षाचे होते.
Next
>मुंबई : खासगी आणि परदेशी बँकांच्या स्पर्धेत नागरी सहकारी बँकेला कॉर्पोरेट चेहरा देणारे आणि हजारो तरुणांना बँकिंग उद्योगाची दालने नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या स्थापनेद्वारे खुले करणारे बँकिंग क्षेत्रतील दादा व्यक्तिमत्त्व व शिवसेना पक्षाचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचे राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 73 वर्षाचे होते.
स्टेट बँकेच्या संचालकापासून ते सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदार्पयत आणि अगदी राज्यसभेतील खासदारपदी असताना ठाकूर यांची कारकिर्द नेहमीच उत्तुंग ठरली. परंतु, हा सर्व प्रवास संघर्षाचाच राहिला. सारस्वत बँकेच्या कामकाजात ठाकूर सक्रिय होईर्पयत बँकेची उलाढाल 46क्क् कोटी रुपयांची होती. मात्र, सारस्वत बँकेला देशातील पहिल्या 1क् क्रमांकात आणण्याचा निश्चय करून त्यांनी अनेक अभिनव संकल्पना राबविल्या आणि सरत्या 13 वर्षात बँकेच्या उलाढालीने 36 हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या तब्बल 25क् अधिक शाखाही सुरू झाल्या होत्या. महाराष्ट्राबाहेर बँकेच्या शाखा सुरू करण्याचा परवाना मिळविणारी सारस्वत ही पहिलीच सहकारी बँक ठरली. बँकिंग क्षेत्रतील त्यांच्या विद्वत्तेचा राज्याला फायदा व्हावा म्हणून शिवसेनेने ठाकूर यांना राज्यसभेवरही पाठविले होते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ ठाकूर हे कर्करोगाने त्रस्त होते. कर्करोगाशी लढा देत असतानाही बँकिंग क्षेत्रतील आपले काम त्यांनी जोमाने सुरू ठेवले होते. गेल्या महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. (प्रतिनिधी)
आज अंत्यसंस्कार
एकनाथ ठाकूर यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेर्पयत प्रभादेवी येथील सारस्वस्त बँक भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.