अकोल्यात विषबाधेने एकाचा मृत्यू; चार जण गंभीर

By Admin | Published: March 4, 2016 02:22 AM2016-03-04T02:22:41+5:302016-03-04T02:22:41+5:30

पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलेली पावडरच ठरली घातक .

Ekolite poisoning death; Four people are serious | अकोल्यात विषबाधेने एकाचा मृत्यू; चार जण गंभीर

अकोल्यात विषबाधेने एकाचा मृत्यू; चार जण गंभीर

googlenewsNext

व्याळा (अकोला) : अकोला जिलतील व्याळा येथे पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी टाकलेल्या पावडरमुळे गुरुवारी एका कुटुंबाला विषबाधा झाली. यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य चौघांची प्रकृती गंभीर आहे. शांताराम सोळंके (५५) असे मृत ग्रामस्थाचे नाव आहे. व्याळा येथे पाणीपुरवठय़ासाठी गावात बोअरवेल असून काही भागांमध्ये अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे शांतराम सोळंके यांनी बाजारातून रासायनिक पावडर आणून पाण्याच्या माठात बुधवारी रात्री टाकली होती. सोळंके कुटुंबीयांनी माठातील पाणी प्याल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. काहींची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

Web Title: Ekolite poisoning death; Four people are serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.