बलात्काराला विरोध केल्याने वृद्धेचा खून

By admin | Published: December 15, 2014 04:02 AM2014-12-15T04:02:41+5:302014-12-15T04:02:41+5:30

कामगार रुग्णालय वसाहतीत महिलेचा खून झाल्याप्रकरणी दीपक पांडे याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली होती. बलात्काराला विरोध केल्यानेच तिचा खून

Elderly blood due to protesting against rape | बलात्काराला विरोध केल्याने वृद्धेचा खून

बलात्काराला विरोध केल्याने वृद्धेचा खून

Next

जितेंद्र कालेकर, ठाणे
कामगार रुग्णालय वसाहतीत महिलेचा खून झाल्याप्रकरणी दीपक पांडे याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली होती. बलात्काराला विरोध केल्यानेच तिचा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे़ ठाणे न्यायालयाने त्याला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़
विमला पांडे (७०, रा. आजमगढ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ती ९ डिसेंबरला आजमगढ येथून दिघा येथील श्वेता या नातीकडे आली होती. ती ठाण्यात उतरली. तिची आणि श्वेता व तिच्या भावी पतीची भेटही झाली. पण नंतर चुकामूक झाली. ती ‘श्वेता.. श्वेता...’ ओरडत असताना दीपकने श्वेताला ओळखत असल्याची बतावणी केली. तोही भोजपुरीमध्ये बोलत असल्यामुळे विमलाचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याने तिला कामगार रुग्णालय वसाहतीत आणले. तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला. त्याने तिच्या कपाळावर काँक्रीटच्या ब्लॉकने प्रहार केला. तिने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी त्याने तिला तिसऱ्या मजल्यावरून फेकले. (प्रतिनिधी)

Web Title: Elderly blood due to protesting against rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.