वृद्ध वडीलांना वा-यावर सोडणा-यावर गुन्हा दाखल
By admin | Published: September 12, 2016 02:58 PM2016-09-12T14:58:15+5:302016-09-12T14:58:15+5:30
वृद्ध वडिलांना वा-यावर सोडू पाहणा-या मुलावर नागपूरमधील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १२ - वृद्ध वडिलांना वा-यावर सोडू पाहणा-या मुलावर प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नितीन बद्रीप्रसाद शहा (वय ४८) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
बद्रीप्रसाद गंगाभूषण शहा (वय ७८) हे आयुध निर्माणीतील निवृत्त अधिकारी आहे. त्यांना २० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. त्यांना चार मुले असून, त्यातील एक विदेशात उच्चपदावर कार्यरत आहे. ईतर तीन मुले नागपुरात राहतात. त्यातील एक मनिषनगरात तर नितीन आणि अन्य एक प्रतापनगरातील गुडधे लेआउटमधील प्रशस्त निवासस्थानी राहतात. नितीन लॅण्डस्केपिंगचे कंत्राटदार आहेत. १५ ते १७ वर्षांपासून वडीलांचा ते सांभाळ करीत आहेत. याच घरात राहणारा त्यांचा दुसरा भाऊ खासगी नोकरी करतो. तर, मनिषनगरातील भाऊ एलआयसीत आहे. सुखवस्तू अशा या कुटुंबातील वडिलांचा सर्वच भावांनी सांभाळ करावा, अशी नितीनची भूमिका आहे. रविवारी वडील आणि भाऊ गणपतीचे जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. परत आल्यानंतर त्यांना आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून दिसले. नितीन यांनी त्यांच्या ताब्यातील रुममध्ये येऊ देण्यास मज्जाव केला. त्यावरून भावाभावांमध्ये वाद झाला. तो प्रतापनगर ठाण्यात पोहचला. वडील राहत असलेली रुम आपल्या नावावर आहे, आपल्याला नुतनीकरण करायचे आहे. आपण १५ वर्षांपासून वडीलांचा सांभाळ करतो, आता ईतर भावांनी त्यांना सांभाळावे, अशी त्यांनी भूमिका घेतली. मात्र, ईतर भावांनी वडीलांना (ज्येष्ठ नागरिक) वा-यावर सोडल्याचा आरोप करून तशी तक्रार प्रतापनगर ठाण्यात नोंदवली.
ताठर भूमिका
ठाणेदार शिवाजी गायकवाड आणि त्यांच्या सहका-यांनी या सुखवस्तू कुटूंबातील वादाचा आपसी समेट घडावा, म्हणून बरेच प्रयत्न केले. मात्र, दोन्हीकडून आपलीच बाजू बरोबर असल्याची भूमिका घेण्यात आल्याने शेवटी पीएसआय निशा बनसोड यांनी नितीन शहा यांच्याविरुद्ध वृद्ध वडीलांना वा-यावर सोडण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला