ठाण्यात संविधान सन्मान मोर्चाचा एल्गार
By admin | Published: October 23, 2016 04:46 PM2016-10-23T16:46:24+5:302016-10-23T16:46:24+5:30
ना जातीसाठी ना मातीसाठी आम्ही आलो संविधानाच्या सन्मानासाठी असा नारा देत रविवारी लाखो आंबेडकरी नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर
Next
>ऑनलाइऩ लोकमत
ठाणे, दि. 23 - ना जातीसाठी ना मातीसाठी आम्ही आलो संविधानाच्या सन्मानासाठी असा नारा देत रविवारी लाखो आंबेडकरी नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संविधानाच्या मूळ गाभ्याला छेद देणाऱ्या काही मागण्या पुढे येऊ लागल्याने त्याचा विरोध करणे गरजेचे आहे. यासाठीच हा संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
ऍट्रॉसिटी कायद्याची अधिक कडक अमलबजावणी करण्यात यावी , नाशिक येथे दलित कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शा सन करा, दलित आदिवासींयावरील जातीय अत्याचारांना कठोर पायबंद घाला , कोपर्डीमधील त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी,अट्रोसिटी कायद्याच्या अंलबजावणीची श्वेत पत्रिका जाहीर करा, डॉ नरेंद्र दाभोलकर , कॉ गोविंद पानसरे , डॉ कलबुर्गी यांच्या मारेकर्यांना आणि खुनाच्या सूत्रधाराणा फाशीची शिक्षा द्या , विस्थापित भटक्या विमुक्त समाजाचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करा , इतर मागासवर्गीय समाजाचे घटनांत्मक आरक्षण कायम ठेवा , मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर करा , मराठा समाजालाही संविधानाच्या तरतुदीनुसार आरक्षण देण्यात यावे, पाटील समितीचा अहवाल जाहीर करा , आदिवासींचे कुपोषण थांबवा , शेतकर्यक्रत्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेती धोरण जाहीर करा. कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल थांबवा, कंत्राटी पद्धत बंद करून बंद झालेले कारखाने सुरु करा , जमिनीचे राष्ट्रयीकरण करा आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या मोर्चात नानासाहेब इंदिसे, शामदादा गायकवाड , चंद्रकांत हंडोरे, काकासाहेब खंबाळकर, रवी गरूड , समाधान नावकर, भय्यासाहेब इंदिसे, सुनील खांबे, जितेंद्रकुमार इंदिसे , भास्कर वाघमारे, उत्तम खडसे, राजय गायकवाड, किरण चन्ने, चंद्रभान आझाद, प्रमोद इंगळे, पंढरीनाथ गायकवाड, संदीप खांबे, मुश्ताक बाबा, अनिस कुरेशी, बाबासाहेब कांबळे , आबासाहेब चासकर आदी मान्यवर उपस्थित होते
अहमदनगर येथील कोपर्डी गावातील घटनेननंतर राज्यभरात ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा आणि इतर मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत. कोपर्डीची ती अमानुष घटना आणि संविधानाने मागासवर्गीयांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी दिलेल्या ऍट्रॉसिटी कायद्याचा काहीही संबंध नाही. तरीही राज्यातील जनतेमध्ये जाणीवपपूर्व या कायद्याच्याबाबत गैरसमज पसरविला जात आहे. त्यांचे हे असे कृत्य संविधानाच्या उद्देशाला छेद देणारे आहे. म्हणूनच संविधानचा खरा देश हिताचा उद्देश तमाम भारतीय नागरिकांपर्यंत पोहचावा, संविधानाबाबत गैर समज पसरविणे थांबले जावे आणि या देशातील संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले सर्व अधिकार अबाधित राहावेत, यासाठी संविधान सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्यामदादा गायकवाड यांनी यावेळा बोलताना सांगितले . रख रखत्या उन्हात लाखो दलित, आदिवासी, भटके विमुक्त ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाचे बांधव मोर्चाला मोठ्या संख्येने आले होते महिलांची उपस्थितीही प्रचंड प्रमाणात होती.