निवडणूक निकषानुसार आयुक्त, आयजी करणार अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 10:03 PM2019-02-03T22:03:08+5:302019-02-03T22:50:53+5:30

महासंचालक कार्यालयाचा संभ्रम; दहा दिवसांत तीन स्वतंत्र परिपत्रके

on Election commision basis will transfer Commissioners, IG officials | निवडणूक निकषानुसार आयुक्त, आयजी करणार अधिकाऱ्यांच्या बदल्या

निवडणूक निकषानुसार आयुक्त, आयजी करणार अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next

- जमीर काझी

मुंबई : लोकसभा निवडणूकीचा प्रत्यक्ष बिगुल अद्याप वाजला नसलातरी प्रशासनाकडून त्याबाबतची पातळी युद्धपातळीवर सुरु झाली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने अधिकाºयांच्या बदल्याबाबच्या सुचनाची पूर्तता करताना पोलीस महासंचालक कार्यालयाची संभ्रामवस्था निर्माण झाली आहे. गेल्या दहा दिवसात तब्बल तीन स्वतंत्र परिपत्रके बजाविली असून प्रत्येकवेळी नियम बदलण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार बदल्याचे अधिकार आता पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांना देण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालयातील उपायुक्तापासून ते उपनिरीक्षकापर्यतच्या बदल्या संबंधित आयुक्तांकडून तर परिक्षेत्रातील बदल्या विशेष महानिरीक्षकाकडून केल्या जाणार आहेत. परिक्षेत्र व आयुक्तालयातील कार्यकाळ पुर्ण झालेल्यांच्या बदल्या महासंचालक कार्यालयाकडून केल्या जातील, यासंबंधीची कार्यवाही येत्या दहा फेबु्रवारीपर्यत पूर्ण करावी, असे आदेश पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत.


निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पोलीस घटकातून बदलीपात्र अधिकाºयांची माहिती मागविण्यासाठी २२ जानेवारीला पोलीस मुख्यालयातून राज्यातील सर्व पोलीस घटकांना पत्र जारी करण्यात आले.त्यानंतर दुसºया दिवशी पुन्हा त्यामध्ये बदल करुन शुद्धीपत्र लागू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारी आणखी एक पत्रक जारी करण्यात आले आहे. नव्या सूचनानुसार आता आयोगाच्या निकषामध्ये बसत असलेल्या अधिकाºयांच्या बदल्या करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त व विशेष महानिरीक्षकांना देण्यात आले आहेत.


निवडणूक आयोगाच्या बदलीचे निकष
* एका जिल्ह्यात चार वर्षामध्ये तीन वर्षे सेवा झालेले , स्वत:च्या जिल्ह्यात कार्यरत तसेच २०१४ च्या निवडणूकीत ज्याठिकाणी कार्यरत असलेले असलेले उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाचे अधिकाºयांच्या बदल्या विशेष महानिरीक्षकांनी परिक्षेत्रातील अन्य घटकामध्ये करावयाच्या आहेत. कार्यकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाºयांच्या बदल्या केल्या जातील .त्यासाठी उपरोक्त तीनही निकषाचा भंग होणार नसल्याची दक्षता घ्यावयाची आहे.
* मुंबई पोलीस आयुक्तालय वगळता अन्य आयुक्तालयातील आयुक्तांनी उपरोक्त दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या करावयाच्या आहेत. अधिकाºयांच्या परिश्रेत्र व आयुक्तालयाच्या ८ वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण झाला असल्यास किंवा ३१ मे २०१९ पर्यत पुर्ण होणार असल्यास त्या अधिकाºयांची माहिती पोलीस महासंचालकांना द्यावयाची आहे. त्या अधिकाºयांची बदली अस्थापना वर्ग क्रं.२ कडून केली जाईल.
* जे पोलीस अधिकारी स्वत:च्या जिल्ह्यात कार्यरत आहेत, परंतू ३० नोव्हेंबर २०१९ पर्यत निवृत्त होणार आहेत, त्यांच्या त्याच घटकात अकार्यकारी पदावर नेमणूक करावयाची आहे. त्यांना निवडणूकीसंबंधी कोणतीही ड्युटी द्यावयाची नाही.
* फौजदारी गुन्हे नोंद असलेल्या त्यांना त्वरित अकार्यकारी शाखेत बदली करावी, विधानसभा निवडणूक नोव्हेंबर २०१९ पर्यत त्यांची नेमणूक करु नये
* मुंबई आयुक्तालयातर्गंत शहर व उपनगर असे दोन जिल्हे आणि सहा लोकसभा मतदार संघ आहेत. याठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाºयांनाही बदलीबाबतचे उपरोक्त नियम कायम असून त्यांची गेल्या निवडणूकीतील बदलीचा जिल्हा व लोकसभा मतदारसंघ यावेळी कायम राहणार नाही याची बदली करताना आयुक्तांनी दक्षता घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे परिविक्षाधीन उपनिरीक्षक असल्यास स्वत:चे जिल्हा व पोलीस शिपाई म्हणून यापूर्वी च्या घटकात कार्यरत असतील त्यांना इतर जिल्हे , लोकसभा मतदार संघ वगळून बदल्या कराव्यात,
----------------------------
मुख्यालयातील ‘सेंटीग’ थांबणार
निवडणूक नियमानुसार बदली होणारे अधिकारी गेल्या महिन्याभरापासून पोलीस मुख्यालयात येरझाºया सुरु आहेत. ते थेटपणे, अप्रत्यक्षपणे संबंधित ‘डेस्क ’च्या अधिकाºयांशी संपर्क सांधून सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण चर्चा करीत आहेत. महासंचालकांनी आता आयुक्त आणि आयजी स्तरावर बदलीचे अधिकार दिल्याने त्यांची ‘सेंटीग’ बंद होणार आहे.
-----------------------
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी परिपत्रकामध्ये आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत. आयुक्तालय व परिश्रेत्रातील कार्यकाळ पूर्ण होणाºया अधिकाºयांच्याच बदल्या अस्थापना मंडळ-२ कडून केल्या जातील.
- कुलवंत सारंगल ( अप्पर महासंचालक, अस्थापना विभाग)

Web Title: on Election commision basis will transfer Commissioners, IG officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.