Palghar Loksabha Bypoll Result 2018: निवडणूक आयोगाची कार्यपद्धती लोकशाहीला घातक, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 05:52 PM2018-05-31T17:52:16+5:302018-05-31T17:52:16+5:30

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

Election Commission's methodology is dangerous for democracy, Uddhav Thackeray's fatal critique | Palghar Loksabha Bypoll Result 2018: निवडणूक आयोगाची कार्यपद्धती लोकशाहीला घातक, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

Palghar Loksabha Bypoll Result 2018: निवडणूक आयोगाची कार्यपद्धती लोकशाहीला घातक, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

Next

मुंबई- पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपासह निवडणूक आयोगावर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, पालघरमध्ये भाजपच्या काही लोकांना पैसे वाटताना पकडलं, त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली गेली नाही. रात्रभरात लाखभर मत वाढतातच कशी?, पालघरमधली निवडणूक यंत्रणा पक्षपात करणारी आहे.

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं झाल्याची भावनाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांना लोकशाहीचे धडे देण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोगाला लोकशाहीची बुज असेल तर पालघरमधल्या प्रकरणाचा छडा लावा. तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करा. पालघरमध्ये ईव्हीएम बंद पडली, निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीयांनी तक्रार करायला हवी, मतदान यंत्रं ऐनवेळी बंद कशी पडतात ?, निवडणूक यंत्रणा बिघडलेली असून, भ्रष्ट झाल्याचा आरोपही शिवसेनेनं केला आहे.  

Web Title: Election Commission's methodology is dangerous for democracy, Uddhav Thackeray's fatal critique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.