निवडणूक आयोगाची ‘स्विप’ कार्यप्रणाली सुरू

By Admin | Published: September 24, 2016 02:50 AM2016-09-24T02:50:36+5:302016-09-24T02:50:36+5:30

भारतीय राज्यघटनेने मतदानाचा हक्क प्रत्येक भारतीय नागरिकास दिला आहे.

Election Commission's 'swipe' functioning continues | निवडणूक आयोगाची ‘स्विप’ कार्यप्रणाली सुरू

निवडणूक आयोगाची ‘स्विप’ कार्यप्रणाली सुरू

googlenewsNext


अलिबाग : भारतीय राज्यघटनेने मतदानाचा हक्क प्रत्येक भारतीय नागरिकास दिला आहे. १८ वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिक मतदान करु शकतो. मतदानाचा हा पवित्र हक्क बजावता यावा यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. पात्र असलेला कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेळोवेळी करण्यात येते. भारत निवडणूक आयोगाने नूतन मतदार नोंदणीच्या ‘स्विप’ कार्यक्र माची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम जिल्ह्यात सुरू झाल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेच्या सूत्रांनी दिली आहे.
मतदार यादीत नाव नसेल तर जवळच्या मतदार नोंदणी केंद्रावर जाऊन त्याची नोंदणी करावी. आपले नाव मतदार यादीत असल्यास आपले फोटो आयडी करु न घेण्यासाठी आपले दोन फोटो मतदान नोंदणी केंद्रावर सादर करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये १ जानेवारी २०१७ या दिवशी ज्या नागरिकांचे वयवर्षे १८ पूर्ण होत आहेत अशा नागरिकाला मतदान करता यावे यासाठी त्याचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्र म १६ सप्टेंबरपासून सुरु झाला असून ५ जानेवारी २०१७ पर्यंत राबविण्यात येत आहे. १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्र माचे वेळापत्रक निश्चित के ले.
विशेष मोहीम दिनांक ९ आॅक्टोबर २०१६, दावे व हरकती निकाली काढणे १६ नोव्हेंबर २०१६ पर्यंत, डाटाबेस अद्यावतीकरण १५ डिसेंबर २०१६ पर्यंत, अंतिम मतदार यादी प्रसिध्दी ५ जानेवारी २०१७ असे नियोजन आहे.
>हरकतीचा कालावधी : प्रारु प मतदार यादीची प्रसिध्दी १६ सप्टेंबर २०१६, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६,मतदार यादीमधील संबंधित भागाचे/सेक्शनचे ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व बैठक आदी नावांची खातरजमा करणे ३० सप्टेंबर .

Web Title: Election Commission's 'swipe' functioning continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.