विधान परिषद निवडणूक; कोट्याच्या गणितामुळेच झाले विजयाचे ‘डाव’खरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:22 AM2018-06-30T06:22:22+5:302018-06-30T06:22:38+5:30

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघात विलास पोतनीस, मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील विजयी

Election of legislative council; Quantity of mathematics was the result of 'victory' | विधान परिषद निवडणूक; कोट्याच्या गणितामुळेच झाले विजयाचे ‘डाव’खरे

विधान परिषद निवडणूक; कोट्याच्या गणितामुळेच झाले विजयाचे ‘डाव’खरे

Next

नवी मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघात विलास पोतनीस, मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील विजयी झाल्याचे गुरुवारी रात्री उशिरा तर कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे विजयी झाल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आले. ही मतमोजणी २४ तास चालली. त्यात एकल संक्रमणीय पद्धतीने मतदान झाले. त्यामुळे प्रथम उमेदवारांनी विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने याचा फायदा निरंजन डावखरे यांना झाला. रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
मुंबई शिक्षकसाठी ३९५१ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. तेथे ७९०० वैध मतदान होते. कपिल पाटील यांना या निवडणुकीत ४०५० मते बाद फेऱ्यांत मिळाली. कोकण पदवीधरसाठी ३५ हजार १४३ चा कोटा होता. निवडणुकीसाठी ७० हजार २८५ मतदान झाले होते. डावखरे यांना २९ हजार ३५ मते तर नजीब मुल्ला यांना १४ हजार ६२५ आणि संजय मोरे यांना २३ हजार २५८ मते मिळाली.
येथे १४ उमेदवार रिंगणात उभे होते. मात्र असे असले तरीही विजयासाठी आवश्यक कोटा कुणीच कुणालाच पूर्ण करता आला नाही. आवश्यक असलेला हा कोटा पूर्ण न केल्याने कमी मते मिळालेल्या ११ उमेदवारांची मते प्रमुख तीन उमेदवारांना ट्रान्स्फर करण्यात आली. मात्र असे करूनही विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर तिसºया क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मते डावखरे, मोरे यांना ट्रान्स्फर करण्यात आली.
त्यानंतर डावखरे यांची मतसंख्या ३० हजार १९१ एवढी तर संजय मोरे यांची २४ हजार ७०४ झाली. तरीही कोटा पूर्ण न झाल्याने पहाटे ४.१५ वाजता दुसºया क्रमांकावरील संजय मोरे यांची मते निरंजन डावखरे यांना ट्रान्स्फर करण्यात आली. त्यामुळे निरंजन डावखरे यांच्या मतांचे मूल्य ३२ हजार ८३१ इतके झाले.
डावखरे यांच्या मतांचे मूल्य कोटा पद्धतीमुळे वाढले असले तरीही ते ३५ हजार १४३ मतांचा कोटा काही केल्या पूर्ण करू शकले नाहीत. मात्र असे असले तरी विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात ते एकमेव उमेदवार उरले होते. म्हणूनच अखेर याची नोंद घेत निरंजन डावखरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या अनुमतीने विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पहाटे ५ वाजता पूर्ण होऊन १४ उमेदवार एलिमेट झाल्यानंतर टीडीएफचे शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे साडेदहा हजार मताधिक्क्याने विजयी झाली.
त्यांना २४,३६९ मते मिळाली, प्रतिस्पर्धी टीडीएफचे संदीप बेडसे यांना १३८३० मते मिळाली. रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत मोजणीतून भाजपाचे अनिकेत पाटील, प्रताप सोनवणे, टीडीएफचे शालिग्राम भिरुड, भाऊसाहेब कचरे यांना बाद ठरविण्यात आले.

मुंबई पदवीधर :
१. विलास पोतनीस (मते १९३५४)
२. अमितकुमार मेहता (मते ७७९२)
३. जालिंदर सरोदे (मते २४१४)
मुंबई शिक्षक :
१. कपिल पाटील (मते ४०५०)
२. शिवाजी शेंडगे (मते १७५४ )
३. अनिल देशमुख (मते ११४७)
कोकण पदवीधर :
१. निरंजन डावखरे (मते ३२८३१)
२. संजय मोरे (मते २४७०४ )
३. नजीब मुल्ला (मते १४८२१)

Web Title: Election of legislative council; Quantity of mathematics was the result of 'victory'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.