Election Live : दहा महानगरपालिकेसाठी सरासरी 42.80 टक्के मतदान

By admin | Published: February 21, 2017 07:36 AM2017-02-21T07:36:20+5:302017-02-21T17:10:32+5:30

अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निकाल देणाऱ्या आणि राज्यातील जनतेचा कौल सांगणा-या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू झाले.

Election Live: 42.80 percent polling for 10 municipal corporations | Election Live : दहा महानगरपालिकेसाठी सरासरी 42.80 टक्के मतदान

Election Live : दहा महानगरपालिकेसाठी सरासरी 42.80 टक्के मतदान

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२१ - अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निकाल देणाऱ्या आणि राज्यातील जनतेचा कौल सांगणा-या  १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू झाले आहे. मात्र राज्यभरात मतदानास जेमेतम प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात दहा महानगरपालिकेसाठी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी 42.80 टक्के मतदान झाले आहे. बृहन्‍मुंबई- 41.32, ठाणे- 45.05, उल्हासनगर- 35.25, नाशिक- 43.20, पुणे- 42.92, पिंपरी चिंचवड- 43.80, सोलापूर- 43.00, अमरावती- 41.24, अकोला- 46.28, नागपूर- 45.72. 
 
 
दुपारी दीड वाजेपर्यंत राज्यात सरासरी 31.01 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये बृहन्‍मुंबई- 32.17ठाणे- 35.11, उल्हासनगर- 24.83, नाशिक- 30.63, पुणे- 30.52, पिंपरी चिंचवड- 30.86, सोलापूर- 32.00, अमरावती- 31.62
अकोला- 32.39 आणि नागपूर- 29.95 टक्के. 
 
 
पहिल्या दोन तांसात ठाण्यात १०.३७%, पिंपरी- चिंचवडमध्ये ७ %, पुण्यात ८ % आणि अकोल्यात ६ टक्के मतदान झाले.  तर १० महापालिकांसाठी सकाळी ११.३० पर्यंत सरासरी 17 टक्के मतदान झाले. मुंबईत 16.04, ठाणे- 19.30, उल्हासनगर- 12.87, नाशिक- 18.54, पुणे- 17.61, पिंपरी चिंचवड- 20.73सोलापूर- 17.00, अमरावती- 19.58, अकोला- 19.24, नागपूर- 16.00 टक्के मतदान झाले.
 
दरम्यान आज सकाळी सरसंघचालक मोहन भागवत, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार नरसय्या आडम, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजावला. सर्वसामान्य नागरिकही सकाळपासून मतदानाच्या रांगेत उभे आहेत मात्र काही ठिकाणी मतदान केंद्रावरील गोंधळामुळे मतदानास विलंब होत आहे. नाशिक तसेच मुंबईतील भायखळा येथे मतदान यंत्रातील बिघाडामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. 
 
या निवडणुकीत मुंबई महापालिकेची लढत सर्वात मानाची आणि प्रतिष्ठेची बनली असून सर्वांचेच लक्ष आज काय होते याकडे लागले आहे.  राज्यातील सत्ताधारी भाजपा-शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेंकांना अक्षरश: ओरबाडत, तिखट टीका केल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरल्याने  उमेदवारांची संख्याही वाढली आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३,२१० जागांसाठी १७,३३१ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यासाठी ४३ हजार १६० मतदान केंद्रांची; तसेच ६८ हजार ९४३ कंट्रोल युनिट व १ लाख २२ हजार ४३१ बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली. ३ कोटी ७७ लाख ६० हजार ८१२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. मतदान शांततेत पार पडावे, यासाठी २ लाख ७३ हजार ८५९ कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ट
 
मतदान अपडेट्स : 
 
 - ठाणे महानगरपालिकेसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झाले 45.05 % मतदान
- पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावामध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत 50.38 टक्के तर लवळे गावामध्ये 53.48 टक्के मतदान झालेले आहे.

- नागपूर - बाबा नानक स्कूल मधील मतदान मशीनला बारकोड नाही लावले म्हणून तनाव 30 मिनिट मतदान झाले नाही.- सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत ४० टक्के मतदाऩ- नाशिक - आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतने तुंगार हरसुल येथील मतदान केंद्रावर कुटूंसह रांगेत उभे राहत बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई - प्रभाग क्रमांक 178 - वडाळा येथे मतदान केंद्र पहिल्या मजल्यावर असल्यामुळे ज्येष्ट नागरिकांची गैरसोय- जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान टक्केवारी (1.30 पर्यंत) - रायगड- 44.58, रत्नागिरी- 38.56, सिंधुदुर्ग- 45.27, नाशिक- 34.33, पुणे- 39.68, सातारा- 42.23, सांगली- 38.28, सोलापूर- 36.81, कोल्हापूर- 43.59, अमरावती- 32.02 आणि गडचिरोली- 44.67 टक्के

- नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा अधिकार.
- नाशिकमध्ये मतदानाला सुरुवात, सकाळपासूनच मतदार रांगेत उभे.
- भायखळा येथील मतदान केंद्रात मोठी गर्दी, बुथक्रमांकाऐवजी मतदार स्लीपवर खोली क्रमांक लिहिल्याने उडाला गोंधळ.
- नाशिक : मतदान केंद्र क्र 15/6 येथे मशीनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने मतदान खोळंबले, मत नोंद होत नसल्याचे लक्षात आल्याने अधिका-यांना केले पाचारण.
- भायखळा पूर्वेकडील महापालिका शाळेत मतदानादरम्यान गोंधळ. मतदारांच्या स्लीपवर वर्गांचे खोली क्रमांक लिहिण्यात आले असून मतदान केंद्र क्रमांक छोट्या अक्षरात लिहीण्यात आल्याने मतदार गोंधळले. मतदार खोली क्रमांकाप्रमाणे बुथ शोधत आहेत. गोंधळामुळे काही केंद्रांवर तोबा गर्दी तर काही ठिकाणी शुकशुकाट.
- गोरेगाव : भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गोरेगांव पूर्वेकडील बिंबीसार नगर येथील मतदान केंद्रावर केले मतदान.
- सोलापूर महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क.
-  वेसावे येथील कोळी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेषात येथील महापालिका शाळेत केली मतदानास सुरवात.
-  बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क.
- नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक यांनी बजावला मतदानाचा अधिकार.
- उल्हासनगर : शांततेत मतदान सुरु, सुभाष टेकडी, खेमानी, मराठा सेक्शन परिसरात मतदान केंद्रा बाहेर रांगा.
- भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांनी ठाण्यात मतदानाचा हक्क बजावला.
-  कुलाबा: अभिनेत्री टीना अंबानीनेही बजावला मतदानाचा अधिकार.
- मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मानेही बजावला मतदानाचा अधिकार. नागरिकांना केले मतदान करण्याचे आवाहन.
- उल्हासनगरातील अनेक मतदार केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने कर्मचा-यांनी व्यक्त केला संताप.
- मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.
- सोलापूर - मतदार यादीत नाव नाही, मतदानापासून वंचित ठेवल्याचा मतदारांचा आरोप, उर्दू कॅम्प प्रशाला येथील घटना.
- लालबाग : प्रभाग क्रमांक २०५ मधील अभ्युदय नगरमधील शिवाजी हायस्कूलमध्ये गर्दी, पहिल्या दीड तासातच प्रत्येक केंद्रावर १०० हून अधिक म्हणजेच सुमारे १० टक्के मतदान झाले आहे. रेकॉर्डब्रेक मतदानाची शक्यता.
- अकोला : प्रभाग ११मध्ये जिल्हा उद्योग केंद्र येथील मतदान यंत्र काही काळासाठी प़डले बंद.
- लासलगाव (नाशिक)- उर्दू शाळेतील मतदान केंद्रात पहिल्या दोन तासात तुरळक मतदान, केंद्रावर सामसूम. आतापर्यंत केवळ 5 टक्के मतदान.
- नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मतदानाचा हक्क बजावला
 पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क. शहरात मतदान संथ गतीने सुरु आहे. मतदान यंत्रावर उमेदवारांचे नाव शोधताना मतदारांचा गोंधळ उडाला आहे.
- पिंपरी चिंचवड : पहिल्या 2 तासांत 7 टक्के मतदान

- मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

- सांगली जिल्हापरिषद निवडणूक : सावळज, ता. तासगाव येथील मतदान केंद्रावर मतदारयादीत गोंधळ. शासकीय यंत्रणेकडुन मतदारांपर्यंत मतदान स्लीप पोहोचल्या नसल्याचा मतदारांचा आरोप.

- ठाणे : पहिल्या २ तासांत १०. ३८ टक्के मतदान.

- नाशिक-जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यात काही ठिकाणी मतदार याद्यांमधील गोंधळ वगळता शांततेत मतदान सुरू आहे. येवला तालुक्यात सकाळी 2 तासात सरासरी केवळ 8 टक्के तर इगतपुरी तालुक्यात 10 टक्के मतदान झाले.

- मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क. काम जिंकतं का पैसा, ते पाहायचंय - मतदानानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया.

- मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केले मतदान.

- नाशिक - म्हसरुल परिसरात सुमारे ७५० मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने नागरिक संतप्त, मतदान केंद्राध्यक्षांना विचारला जाब.

- सोलापूर - रामलाल चौक येथील मतदान यंत्र बंद पडले, तासापासून मतदार रांगेत ताटकळले.

- गडचिरोली : अहेरी तालुक्यातील येलचिल मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू.

- उल्हासनगरमध्ये पाहिल्या दोन तासात 7 % मतदान झाले.

- ओझर (नाशिक)- मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ, अनेक मतदारांचे नाव गायब झाल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण.

- मुंबईत पहिल्या दोन तासांत ८.०७ टक्के मतदान

- ठाणे - प्रभाग क्र १४ मध्ये बाेगस मतदार पकडण्यात आले असून त्यांना वर्तकनगर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील चाैकशी सुरु आहे.

- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले मतदान.

- शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क.

-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा अधिकार.

- दादर पश्चिमेकडील पॉप्युलर निकेतन इमारतीतील ३५ मतदारांची नावं गायब.

- मुंबई : मुलुंड, भांडुपमधील काही भागात मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यन्त रिक्षा सेवा.

- वांद्रे पूर्व सरकारी वसाहत - सकाळी 11.30 पर्यंत 19% टक्के मतदान.

- रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील मंदरुळ येथील मतदान केंद्रांवर वोटिंग मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया थांबली. 

 

 

 

Web Title: Election Live: 42.80 percent polling for 10 municipal corporations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.