मीरा-भार्इंदर महापालिकेची २० आॅगस्टला निवडणूक

By admin | Published: July 16, 2017 01:01 AM2017-07-16T01:01:48+5:302017-07-16T01:01:48+5:30

मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० आॅगस्टला मतदान होणार आहे. २१ आॅगस्टला मतमोजणी होईल. शनिवारपासून आचारसंहिता

Election of Mira-Bharinder Municipal Corporation on 20th August | मीरा-भार्इंदर महापालिकेची २० आॅगस्टला निवडणूक

मीरा-भार्इंदर महापालिकेची २० आॅगस्टला निवडणूक

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० आॅगस्टला मतदान होणार आहे. २१ आॅगस्टला मतमोजणी होईल. शनिवारपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.
सहारिया म्हणाले, मीरा- भाईंदर महानगरपालिकेची मुदत २७ आॅगस्टला संपत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. एकूण २४ प्रभागातील ९५ जागांसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्रे २६ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत दाखल करता येतील. त्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ३ आॅगस्टला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल.

जि. प. आणि पं. स.च्या रिक्त पदांसाठी मतदान
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग; तसेच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठी देखील २० आॅगस्टला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ५ आॅगस्टपर्यंत असेल. निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांना ७ आॅगस्टला निवडणूक चिन्हे देण्यात येतील.
२० आॅगस्टला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.

महापालिकेवर एक दृष्टिक्षेप
एकूण लोकसंख्या - ८,०९,३७८
मतदार (सुमारे) - ५,९३,३४५
एकूण प्रभाग - २४
एकूण जागा - ९५ (महिला ४८)
सर्वसाधारण - ६४ (महिला ३२)
अनुसूचित जाती - ४ (महिला २)
अनुसूचित जमाती - १ (महिला १)
नागरिकांचा मागास प्रवर्ग - २६ (महिला १३)

Web Title: Election of Mira-Bharinder Municipal Corporation on 20th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.