महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
By admin | Published: December 25, 2016 04:13 AM2016-12-25T04:13:01+5:302016-12-25T05:24:53+5:30
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर झाला. या निवडणुकीत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पॅनलने एकहाती विजय मिळविला असून
मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर झाला. या निवडणुकीत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पॅनलने एकहाती विजय मिळविला असून, सर्व नऊ उमेदवारांनी बाजी मारली आहे. नांदेडचे डॉ. संजय कदम यांना सर्वाधिक ९ हजार ९०० मते मिळाली आहेत.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये १८ सदस्य असतात. यामध्ये ९ सदस्य शासननियुक्त तर ९ सदस्य डॉक्टरांमधून निवडले जातात. १८ डिसेंबर रोजी ३५ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ही निवडणूक झाली. त्यात २० हजार १४६ डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
विजयी उमेदवार : डॉ. जयेश लेले (मुंबई), डॉ. संजय कदम (नांदेड), डॉ. अशोक तांबे (बारामती), डॉ. अर्चना पाटे (डोंबिवली), डॉ. मंगेश गुलवाडे (चंद्रपूर), डॉ. अनिल लद्दड (नागपूर), डॉ. दिलीप सारडा (पुणे), डॉ. निसार शेख (अहमदनगर)आणि डॉ. शिवकुमार उत्तुरे (मुंबई) यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)