निवडणूकीत आघाडीला बंडखोरांचे आव्हान

By admin | Published: December 10, 2015 02:45 AM2015-12-10T02:45:09+5:302015-12-10T02:45:09+5:30

विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त इतरांनीही अर्ज दाखल करून

In the elections, the challenge of the rebels is leading the alliance | निवडणूकीत आघाडीला बंडखोरांचे आव्हान

निवडणूकीत आघाडीला बंडखोरांचे आव्हान

Next

मुंबई : विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त इतरांनीही अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. मात्र, १२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
विधान परिषदेच्या ८ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार असून बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर येथे आघाडीच्या उमेदवारांपुढे बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. मुंबईची जागा कॉंग्रेसकडे असून भाई जगताप यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र आज राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांनीही अर्ज दाखल केल्याने आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. ‘माझी उमेदवारी म्हणजे बंडखोरी नाही. मी पक्षाचा राजीनामा देऊन अर्ज भरला आहे. एकूण १० अपक्ष नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला आहे आणि अजून काही नगरसेवक संपर्कात आहेत, असा दावा लाड यांनी केला. तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार महादेव महाडिक यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादी लढणार असून पक्षाने अरुण जगताप यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. असे असताना तेथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. ससाणे काँग्रेसचे माजी आमदार आणि साई संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत.
सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिपक साळुंखे यांच्याविरोधात काँग्रेसचे दिलीप माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपा-शिवसेना-स्वाभिमानी पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रशांत परिचारक यांनी अर्ज दाखल केला.

Web Title: In the elections, the challenge of the rebels is leading the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.