दर्जा देण्याआधीच निवडणुका

By admin | Published: March 9, 2015 02:00 AM2015-03-09T02:00:14+5:302015-03-09T02:00:14+5:30

नगरपालिका, नगरपंचायतींचा दर्जा मिळावा म्हणून जिल्ह्यातील अनेक पात्र ग्रामपंचायतींनी ठाणे जिल्हा परिषदेकडे अर्ज पाठवले होते.

Elections before the rating is given | दर्जा देण्याआधीच निवडणुका

दर्जा देण्याआधीच निवडणुका

Next

सुरेश लोखंडे, ठाणे
नगरपालिका, नगरपंचायतींचा दर्जा मिळावा म्हणून जिल्ह्यातील अनेक पात्र ग्रामपंचायतींनी ठाणे जिल्हा परिषदेकडे अर्ज पाठवले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी ते राज्य सरकारकडे पाठवून निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र त्यातील बहुतेक ठराव जिल्हा परिषदेत अद्याप धूळखात पडून आहेत आणि त्यामुळेच जि.प. निवडणुकांवर ग्रामपंचायतींनी बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींचे नगरपालिका, नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मतदारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांपैकी सुमारे ४७ गटांमध्ये तर ५ पंचायत समित्यांच्या ११० गणांपैकी ९९ गणांमध्ये निवडणुका होऊ शकल्या नाहीत. या जागांवर येत्या सहा महिन्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पण त्या आधी नगरपालिका, नगरपंचायतींच्या स्थापनेचा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सरकारकडे ठराव जाणेदेखील गरजेचे होते. पण हे प्रस्ताव अद्याप जिल्हा परिषदेतच असल्याचे निदर्शनात आले आहे.

Web Title: Elections before the rating is given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.