निवडणुकीआधी साबरमती, आता बारामती - उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
By admin | Published: October 27, 2015 09:13 PM2015-10-27T21:13:52+5:302015-10-27T21:24:14+5:30
निवडणूक लढवताना काही लोक गांधीजींच्या 'साबरमती' सारखे असतात, पण नंतर ते शरद पवारांच्या 'बारामती'सारखे होतात. म्हणजेच निवडणुकीआधी साबरमती
Next
>ऑनलाइन लोकमत,
डोंबिवली, दि. २७ - निवडणूक लढवताना काही लोक गांधीजींच्या 'साबरमती' सारखे असतात, पण नंतर ते शरद पवारांच्या 'बारामती'सारखे होतात. म्हणजेच निवडणुकीआधी साबरमती, आता बारामती, असा टोला उद्धव ठाकरेंनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपला लगावला. त्याचबरोबर स्मार्टसिटीचेही पोकळ आश्वासन भाजप देत असून स्मार्टसिटी म्हणजे काय, याचीच माहिती भाजपच्या नेत्यांना नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे : -
- कल्याण-डोंबिवलीत काल कोजागिरी झाली पण खरी कोजागिरी १ नोव्हेंबरला होणार आहे.
- आम्ही जनतेची कामं करुन मतं मागतो.
- डोंबिवलीतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न शिवसेनेनं सोडवला आहे.
- शिवसेना ही बिल्डरांची नसून भूमिपुत्रांची आहे, आम्हाला जमिनी बळकावणं जमत नाही.
- कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांच्या पाठिशी शिवसेना आहे.
- जर गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचे स्मारक होत असेल तर महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक झाले पाहिजे.
- पाकिस्तानला विरोध केला म्हणून, आम्हाला विरोध करणाऱ्या भाजपचा रंग हिरवा; पाकिस्तानला विरोध केला त्यात काय चुकले.
- भाजपचे कट्टर नेते अरुण शौरींनीच पंतप्रधान कार्यालयावर ताशेरे ओढले आहेत.
- आपापसांत लढण्याची ही वेळ नाही, भगव्यासाठी पाठीमागे या, उध्दव ठाकरेंचं अपक्ष उमेदवारांना आवाहन.