निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भाची घोषणा करावी

By admin | Published: August 10, 2014 01:27 AM2014-08-10T01:27:58+5:302014-08-10T01:27:58+5:30

भाजपाने दिलेले आपले आश्वासन पाळावे आणि येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

Before the elections, separate Vidarbha will be announced | निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भाची घोषणा करावी

निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भाची घोषणा करावी

Next

नागपूर : भाजपाने दिलेले आपले आश्वासन पाळावे आणि येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनात माजी खासदार दत्ता मेघे, अ‍ॅड. अनिल किलोर, चंद्रकांत वानखडे, प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. श्रीहरी अणे, अ‍ॅड. मुकेश समर्थ, प्रतापसिंह चव्हाण, अ‍ॅड. फिरदौस मिर्झा, विष्णू मनोहर, रमेश गजबे, जे.पी. शर्मा, रवींद्र वाघ, तेजिंदरसिंह रेणू, आर.एल. राठोड, मनोरमा जयस्वाल, सुरेश पालीवाल, मेहमूद अंसारी, दिनेश नायडू, नितीन रोंघे, सतीश देऊळकर, विक्रम बोके, अण्णाजी राजेधर, प्रवीण महाजन, दीपक निलावार, अ‍ॅड. नंदा पराते, राम नेवले, श्याम वाघे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘फ्रीडम विदर्भ’तर्फे लाक्षणिक उपोषण
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ‘फ्रीडम विदर्भ’ या संघटनेतर्फे क्रांतिदिनी संविधान चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून स्वतंत्र विदर्भासाठीच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकातून संविधान चौकापर्यंत एक रॅली काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. फ्रीडम विदर्भचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर आणि जांबुवंतराव धोटे यांनी मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)

Web Title: Before the elections, separate Vidarbha will be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.