पुढील वर्षापासून विद्यापीठात निवडणुका

By admin | Published: July 29, 2016 01:26 AM2016-07-29T01:26:43+5:302016-07-29T01:26:43+5:30

गेली अनेक वर्षे बंद असलेल्या विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका आगामी २०१७ च्या शैक्षणिक वर्षापासून नियमित घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

Elections in the University from next year | पुढील वर्षापासून विद्यापीठात निवडणुका

पुढील वर्षापासून विद्यापीठात निवडणुका

Next

मुंबई : गेली अनेक वर्षे बंद असलेल्या विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका आगामी २०१७ च्या शैक्षणिक वर्षापासून नियमित घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली.
नवा विद्यापीठ कायदा मागील अधिवेशनात संमत होणार होता, परंतु तो होवू शकला नाही. येत्या हिवाळी अधिवेशनात तो संमत होईल. त्यामुळे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका घेण्यात येतील. नव्या कायद्याअभावी अकृषक विद्यापीठांतील प्राधिकरणांच्या निवडणुका यंदा घेता आलेल्या नाहीत, मात्र कुलगुरुंनी त्यांच्या अधिकारांमध्ये अभ्यास मंडळे नियुक्त केली आहेत, त्यामुळे विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम तयार होण्यात कोणत्याही अडचणी नाहीत, असे तावडे यांनी सांगितले. शिवसेनेच्या नीलम गो-हे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.

कागदाच्या किंमतीमुळे पुस्तके महागली
कागदाच्या वाढत्या किमतीमुळे इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली.
या वर्षी इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली असून पाठयपुस्तकातील पानांचा आकार वाढविण्यात आला आहे. छपाईमध्येही बदल करण्यात आला आहे. पाठयपुस्तक निर्मितीसाठी लागणा-या खर्चामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाठयपुस्तकांच्या किंमती वाढल्या आहेत, असे तावडे यांनी सांगितले.

Web Title: Elections in the University from next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.