प्रभाग समित्यांच्या २२ जूनला निवडणुका
By Admin | Published: June 13, 2016 04:09 AM2016-06-13T04:09:25+5:302016-06-13T04:09:25+5:30
केडीएमसीच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
कल्याण : केडीएमसीच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २२ जूनला होणाऱ्या निवडणुकीत अध्यक्षपद पटकावण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.
२७ गावांच्या समावेशानंतर महापालिकेचे १२२ प्रभाग झाले आहेत. यापूर्वी अ, ब, क, ड, ह, फ, ग असे ७ प्रभाग होते. परंतु, प्रभाग पुनर्रचनेनंतर नव्याने प्रभागांची रचना झाली. त्यात ई प्रभाग स्थापन झाला आहे. ह आणि ड प्रभाग मोठा असल्याने या प्रभागांचे विभाजन करण्यात आले.
अ प्रभाग क्षेत्रात एकूण १० प्रभाग आहेत. त्यात शिवसेनेचे ५, भाजपा १, मनसे २, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि एका अपक्षाचा समावेश. ब प्रभाग क्षेत्रात १४ प्रभाग आहेत. यात शिवसेना ११, भाजपा २, मनसे १ तर क प्रभागात १४ प्रभाग असून यात ४ शिवसेना, ४ भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, एमआयएम प्रत्येकी १ आणि ३ अपक्षांचा समावेश आहे.
ड प्रभाग क्षेत्रात २४ प्रभाग असून यात शिवसेना १६, भाजपा ८, काँग्रेसचा एक सदस्य आहे. फ प्रभाग क्षेत्रात ११ प्रभागांपैकी भाजपाचे १० आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. ह प्रभागात १८ प्रभाग आहेत. शिवसेना ८, भाजपा ६, काँग्रेस आणि मनसे प्रत्येकी २, ग प्रभागात ९ प्रभाग असून शिवसेना ३, भाजपा ४, मनसे २ सदस्य आहेत. ई प्रभागात २१ प्रभाग असून शिवसेना ६, बसपा १, मनसे १, भाजपा ८, अपक्ष ५ सदस्य आहेत.
प्रभाग क्षेत्र अध्यक्षपदाची निवडणूक२२ जून रोजी सकाळी ११.३० वाजता होईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज १५ जूनला भरावयाचे आहेत. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० दरम्यान महापालिका सचिव सुभाष भुजबळ यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. २२ जूनला निवडणुकीच्या दिवशीच उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्या वेळी अर्ज मागे घेता येतील. (प्रतिनिधी)