मोबाईलवरील SMS दाखविल्यास महावितरण स्वीकारणार वीजबिल

By admin | Published: July 3, 2017 04:38 PM2017-07-03T16:38:35+5:302017-07-03T16:44:09+5:30

महावितरणच्या वतीने ग्राहकांना मोबाईलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीजबिल भरण्याची सुविधा महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली

Electricity bill to accept MSEDCL after SMS is shown on mobile | मोबाईलवरील SMS दाखविल्यास महावितरण स्वीकारणार वीजबिल

मोबाईलवरील SMS दाखविल्यास महावितरण स्वीकारणार वीजबिल

Next
>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 3 - वीजबिलाबाबत महावितरणच्या वतीने ग्राहकांना मोबाईलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीजबिल भरण्याची सुविधा महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली असून त्याचा लाभ ग्राहकांना होणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

राज्यभरातील सुमारे १ कोटी ३९ लाख वीजग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. या ग्राहकांना महावितरणच्या वीजबिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाईलवर पाठविण्यात येतो. या एसएमएसमध्ये ग्राहक क्रमांक, वीजबिलाची रक्कम तसेच वीजबिल भरण्याची अंतिम तारीख याचा समावेश असतो. राज्यभरातील अशा ग्राहकांना आता मोबाईलवरील एसएमएस दाखवून महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा महावितरणचा प्रयत्न असून एसएमएसद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्राहकांनी महावितरणच्या कॉल सेंटरवरील १९१२, १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपवर अथवा महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Electricity bill to accept MSEDCL after SMS is shown on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.