अभिनेत्री रती अग्निहोत्रीविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल
By admin | Published: January 20, 2017 09:13 AM2017-01-20T09:13:11+5:302017-01-20T09:13:11+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री रती अग्निहोत्री विरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - ज्येष्ठ अभिनेत्री रती अग्निहोत्री विरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रती अग्निहोत्री यांच्या वरळीतील घरातील मीटरमध्ये फेरफार करून ४९ लाख रुपयांची वीजचोरी केली, असा आरोप बृहन्मुंबई इलेक्ट्रीसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्टने लावला असून याप्रकरणी त्यांच्याविरोधात वरळी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रती अग्निहोत्री आणि त्यांचे पती अनिल विरवानी यांच्यावर मीटरमध्ये छेडछाड करुन 48.96 लाख रुपयांची वीज चोरल्याचा आरोप आहे. वरळीतील स्टर्लिंग सी-फेस अपार्टमेन्टमध्ये रती अग्निहोत्री यांचं वास्तव्य आहे. गेल्या २ -३ वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. एप्रिल 2013 पासून या घरातील मीटरमध्ये छेडछाड करुन 1 लाख 77 हजार 647 युनिटचं वीजेचं 48.96 लाखाचं बील अग्निहोत्री यांनी भरलं नाही, असे बेस्टच्या इंजिनिअरच्या लक्षात आले. त्यानंतर इंजिनिअरने तक्रार केल्यामुळे रती अग्निहोत्रींविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बेस्टच्या अधिका-यांनी दिली.