वीजग्राहकांना शॉकच

By admin | Published: October 23, 2016 01:56 AM2016-10-23T01:56:02+5:302016-10-23T01:56:02+5:30

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही वीज कंपन्यांच्या वीजदरवाढ संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली

Electricity consumers shock | वीजग्राहकांना शॉकच

वीजग्राहकांना शॉकच

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही वीज कंपन्यांच्या वीजदरवाढ संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आयोगाच्या मान्यतेनुसार, १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यात आला असला तरी पुढील चार वर्षांचा विचार करता रिलायन्सच्या तुलनेत टाटाची वीज स्वस्त आहे. दरम्यान आयोगाने मान्यता दिलेले दर २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांसाठी लागू राहतील.
टाटाच्या ०-१०० युनिट वीजेचा वापर करणाऱ्या चेंजओव्हर निवासी ग्राहकांच्या आणि रिलायन्सच्या ग्राहकांच्या वीज दरात मोठा फरक असणार नाही; अशा रितीने वीजदर निश्चित करण्यात आले आहेत. टाटाचे दरमहा १०० युनिटपर्यंत वीजेचा वापर करणारे बहुतांश निवासी ग्राहक हे रिलायन्सकडून टाटाकडे चेंजओव्हर करून आले असून, त्यांचा वीजदर कमी करण्यात आला आहे. टाटाने आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी सरासरी वीजदरात मागितलेल्या १७ टक्के कपातीऐवजी आयोगाने १.८५ टक्के वाढ मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ या आर्थिक वर्षांत आयोगाने अनुक्रमे सरासरी वीजदर २.२६ आणि २.५१ टक्के वाढविला आहे. २०१९-२० मध्ये सरासरी वीजदर १४.९३ टक्क्यांनी कमी केला आहे. टाटाने २०१७-१८ आणि २०१८-१९ करिता ६ आणि २ टक्के वाढ व २०१९-२० करिता २ टक्के कपातीची मागणी केली होती.
रिलायन्सने चालू आर्थिक वर्ष २०१६-१७ करिता सरासरी वीजदरात प्रस्तावित केलेल्या ६ टक्के वाढीऐवजी आयोगाने १.९३ टक्के कपात मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षांमध्ये देखील आयोगाने सरासरी वीजदर अनुक्रमे ०.७६, १.०६, १५.१३ टक्क्यांनी कमी केला आहे. रिलायन्सने या वर्षांसाठी वीजदरांमध्ये ३ टक्के वार्षिक वाढ मागितली होती. रिलायन्सच्या कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी १०१-३०० युनिटचा विचार करता या वर्गवारीत टाटाचे दर रिलायन्सपेक्षा कमी आहेत. परिणामी या वर्गातील टाटाच्या वीजवापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. तर ३०१-५०० या युनिटचा विचार करता रिलायन्सचे वीजदर कमी असून, टाटाचे वीजदर अधिक आहेत. शिवाय शेवटच्या म्हणजे ५०० वर युनिट वापरकर्त्यांसाठी टाटाच्या तुलनेत रिलायन्सचे वीज दर कमी असल्याने रिलायन्सच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)

टाटाचे वीज दर (रुपयांत)
युनिट२०१६-१७२०१७-१८२०१८-१९२०१९-२०
१००२.९०३.३३३.६७३.३६
१०१-३००५.१७५.९६६.५३५.७६
३०१-५००९.५७१०.२११०.३७८.७६
५०० वर११.८४१२.७२१२.८५१०.३६
रिलायन्सचे वीज दर (रुपयांत)
युनिट२०१६-१७२०१७-१८२०१८-१९२०१९-२०
१००३.६०३.८८४.१४३.७४
१०१-३००७.६५७.७२७.३१६.०४
३०१-५००९.०९९.२७९.३०८.८४
५०० वर१०.९८११.२४११.३७१०.५४

Web Title: Electricity consumers shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.