आॅनलाइन सेवेला वीज ग्राहकांची पसंती

By admin | Published: January 16, 2015 06:20 AM2015-01-16T06:20:29+5:302015-01-16T08:21:04+5:30

२०१४मध्ये आॅनलाइन व एटीपी मशिनद्वारे वीज बिल भरणाऱ्या महावितरणच्या वीज ग्राहकांची संख्या तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली

Electricity consumers want online service | आॅनलाइन सेवेला वीज ग्राहकांची पसंती

आॅनलाइन सेवेला वीज ग्राहकांची पसंती

Next

मुंबई : २०१४मध्ये आॅनलाइन व एटीपी मशिनद्वारे वीज बिल भरणाऱ्या महावितरणच्या वीज ग्राहकांची संख्या तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली असून, राज्यातील एकूण २.२९ कोटी ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतल्याने अधिकाधिक वीज ग्राहकांचा कल हा आॅनलाइन सेवेकडे असल्याचे चित्र आहे.
वीज ग्राहकांना त्यांच्या सोयीने कधीही पैसे भरता यावेत म्हणून एटीपी मशिनची सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचाही उपयोग ग्राहक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. २०१४मध्ये राज्यातील सुमारे १ कोटी ग्राहकांनी एटीपी मशिनद्वारे १८७९.३४ कोटींचे वीज बिल भरले आहे. २०१३ साली १५५८.९० कोटींचे वीज बिल भरले आहे. ग्राहकांना एटीपी मशिनद्वारे पैसे भरणे सोयीचे व्हावे म्हणून २०१३च्या तुलनेत २०१४ साली एकूण ४० नव्या एटीपी मशिन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात सध्या १६७ एटीपी मशिन्स कार्यरत आहेत. २०१४ साली राज्यातील एकूण १.२६ कोटी ग्राहकांनी सुमारे १६७३.९४ कोटी एवढ्या वीज बिलाचा भरणा आॅनलाइन केला आहे. २०१३
साली सुमारे ९१.१८ लाख ग्राहकांनी १२२२.८ कोटी रुपये आॅनलाइन
भरले. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity consumers want online service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.