सरकारच्या अपेक्षा वीज वितरकांना पूर्ण कराव्या लागतात - विश्वास पाठक
By admin | Published: June 10, 2017 02:35 PM2017-06-10T14:35:55+5:302017-06-10T14:35:55+5:30
सर्व धोरण वीज निर्मिती भोवती फिरते, वीज निर्मितीच्या बरोबरीने वितरणावर लक्ष देण्याची गरज आहे असे विश्वास पाठक यांनी सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - सर्व धोरण वीज निर्मिती भोवती फिरते, वीज निर्मितीच्या बरोबरीने वितरणावर लक्ष देण्याची गरज आहे असे विश्वास पाठक यांनी सांगितले. ते महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक आहेत. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’ मध्ये बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर मते मांडली. वितरकांना उपलब्ध असलेल्या दराने वीज विकत घ्यावी लागते, मात्र वितरण करताना कमी दराने वीज विकावी अशी अपेक्षा केली जाते असे विश्वास पाठक यांनी सांगितले.
लोकांच्या व सरकारच्या अपेक्षा वीज वितरकांना पूर्ण कराव्या लागतात. लोकांपर्यंत वीज पोहचली पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राकडे अतिरिक्त वीज आहे, पण आपण वीज पुरवठयावर अवलंबून राहतो, काही वेळा काही कारणांमुळे वीज पुरवणारे वेळेत वीज पुरवठा करु शकत नाहीत असे संजीव कुमार यांनी सांगितले. कमी वीज पुरवठा होतो त्यामुळे त्यादृष्टीने धोरण आखले गेले पाहिजे, एखादवेळ वीज पुरवठा केला नाही तर त्यात दंडाची तरतूद नसली पाहिजे असे संजीव कुमार म्हणाले.
दरम्यान देशात सर्वांनी 100 टक्के LED दिव्यांचा वापर केला तर, देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील त्याचबरोबर 112 अब्ज युनिट वीजही वाचेल असे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. कोळसा आता सरप्लस असून, कोळसा आयात बंद करुन आपण स्वत: सक्षम झालो आहोत असे पीयूष गोयल यांनी सांगितले. सर्वांना 24 तास वीज मिळावी यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांमध्ये लोकमतच्या या समिटमुळे मदत होईल असे सांगताना त्यांनी लोकमतच्या ऊर्जा समिट आयोजनाचे त्यांनी कौतुक केले.
18,500 गावाना 1 हजार दिवसात वीज पुरवठा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता 600 दिवस झाले असून 3800 गावात वीज जोडणी बाकी आहे. 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर छप्पर, पाणी आणि वीज देण्याचे आमचे प्रयत्न आहेत असे गोयल म्हणाले. आमच्या सरकारने मागच्या तीनवर्षात शेतकरी आणि खेडयांकडे जास्त लक्ष दिले. एखाद्या संकटात शेतक-याचे नुकसान झाले तर, शेतक-यांना 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुरु केलेली फसल विमा योजना उपयुक्त ठरली असे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
स्वतंत्र भारतात सर्वात सक्षम अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचे नाव घ्यावे लागेल, त्यांच्या कार्यकाळात चालू खात्यातील तूट, महागाई कमी झाली असे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये चालू खात्यात तूट, महागाई जास्त होती. आमच्या सरकारने महागाई 12 टक्क्यावरुन 3 टक्क्यांवर आणली.
The final panel discussion begins.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) June 10, 2017
Topic - Financial Health of State Discoms — The Maharashtra Perspective. @MSEDCL#LokmatUrjaSummitpic.twitter.com/6phuky9zbD