तक्रारी सोडवण्यासाठी वीजग्राहकांचा मेळावा
By admin | Published: July 21, 2016 05:34 AM2016-07-21T05:34:17+5:302016-07-21T05:34:17+5:30
महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांबाबत विविध माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत सर्व उपविभागांच्या कार्यालयांत ग्राहक मेळाव्यांचे आयोजन
मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांबाबत विविध माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत सर्व उपविभागांच्या कार्यालयांत ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ आणि २३ जुलै रोजी आयोजित ग्राहक मेळाव्यांत वाढीव बिलाच्या तक्रारी, वीज बिल विलंबाने मिळणे, चुकीच्या बिलाची दुरुस्ती करणे, नावात बदल करणे, बिलावरील चुकीची माहिती दुरुस्त करणे आणि नवीन वीज जोडणीच्या समस्या सोडवणे यासह ग्राहकोपयोगी विविध सुविधांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. शिवाय महावितरणचे अॅप कसे हाताळावे, याविषयी मार्गदर्शन केले जाईल.
एसएमएसद्वारे वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी, तक्रारींची स्थिती जाणून घेता यावी, यासाठी वीजबिल भरण्याची अंतिम तारीख समजावी, यासाठी महावितरणने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांनी संपर्क साधून ग्राहक क्रमांकासह मोबाइल क्रमांक आणि ई-मेलची नोंद करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहकांनी वीजबिलाची प्रत आणि आधार कार्ड आणावे, असे आवाहन मुख्य अभियंता सतीश करपे यांनी केले. (प्रतिनिधी)