अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग; जयंत पाटील यांच्या दाव्यानुसार अन्य ठिकाणी किती आहेत दर...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 09:53 AM2024-12-12T09:53:59+5:302024-12-12T09:54:16+5:30
जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. वीज बिलात ३०% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे महायुती सरकारमधील लोक मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील अवाढव्य वीज दरावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात सध्या वीज महाग मिळत आहे. आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. वीज बिलात ३०% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे महायुती सरकारमधील लोक मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत.
३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात सध्या वीज महाग मिळत आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे सांगत जयंत पाटील यांनी इतर राज्यातील वीज दराचा तक्ताच दिला आहे.
कोणत्या राज्यात किती वीज दर?
राजस्थान
७.५५ ते ८.९५ रुपये प्रति युनिट
मध्य प्रदेश
३.३४ ते ६.८० रुपये प्रति युनिट
कर्नाटक
५.९० रुपये प्रति युनिट सरसकट
महाराष्ट्र
५.१६ ते १७.७९ रुपये प्रति युनिट