वाशिममधील अख्ख्या गावात होते वीज चोरी
By admin | Published: January 23, 2017 07:43 PM2017-01-23T19:43:39+5:302017-01-23T20:06:53+5:30
मालेगाव तालुक्यातील पांगरखेडा येथे जवळपास अख्खे गावचं वीज चोरी करीत असल्याचे लोकमतने
Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 23 - मालेगाव तालुक्यातील पांगरखेडा येथे जवळपास अख्खे गावचं वीज चोरी करीत असल्याचे लोकमतने २२ जानेवारी रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरून दिसून आले.
वाशिम, दि. 23 - मालेगाव तालुक्यातील पांगरखेडा येथे जवळपास अख्खे गावचं वीज चोरी करीत असल्याचे लोकमतने २२ जानेवारी रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरून दिसून आले.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन जवळ असलेल्या पांगरखेडा हे पूनर्वसित गाव आहे. गावात अद्याप अनेक सुविधा पोहचल्या नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. अनेकांनी विद्युत पुरवठयासाठी अर्जही केल्याची माहिती असून त्यांना अद्याप वीज कनेक्शन मिळाले नाही. या गावातून फेरफटकामारला असता जवळपास संपूर्ण घरावर मेन लाईनवरुन आकोडे टाकून वीज पुरवठा घेण्यात आला आहे. यापूर्वी असलेले विद्युत कर्मचारी यांना याची कल्पना नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सद्यस्थितीत असलेले वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता यांच्याशी संपर्क केला असता आपण नवीन असल्याने याची कल्पना नसल्याचे सांगितले. एकीकडे वीज चोरीबाबत कारवाई होत असतांना दुसरीकडे अख्खे गाव विज चोरी करीत असून याची कल्पना कंपनीला नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रत्येक घरासमोरील खांबावर एक लांब बांबू व खांबावर असलेल्या तारावर आकडा टाकून घरात वीज पुरवठा नेण्यात आला आहे. अख्खे गाव आकडा टाकून वीज चोरी करत आहे याचे नेमके कारणही अद्याप कंपनीने शोधले नाही.
''पांगरखेडा येथे आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याची आपल्याला कल्पना नाही. मी गत महिन्यापासून येथे कार्यरत झालो असल्याने अनभिज्ञ आहे. माझे बऱ्याच गावात भेटी देवून झाल्या आहेत. तेथे आढळलेले गैरप्रकार थांबविले असून, पांगरखेडा येथेही लवकरच भेट देवून तेथे वीज चोरी होत असल्यास त्याला रोखण्यात येईल. आपण सदर बाब निदर्शनास आणून दिल्याने आधी या गावाची पाहणी जरुन केल्या जाणार आहे, असे जीवन इंगळे सहायक अभियंता, शिरपूर जैन वीज वितरण कंपनी यांनी सांगितले.