ट्रान्सफार्मरमधूनच वीजचोरी

By admin | Published: June 27, 2014 12:38 AM2014-06-27T00:38:20+5:302014-06-27T00:38:20+5:30

वीजचोरी रोखण्यासाठी लावण्यात आलेले एबी केबल आणि आरमरचा तोड वीजचोरांनी शोधला आहे. आत थेट ट्रान्सफार्मरमधूनच (डीपी) वीज चोरी केली जात आहे. एकप्रकारे समांतर वीज वितरण प्रणाली उभी करण्यात आली आहे.

Electricity from Transformers | ट्रान्सफार्मरमधूनच वीजचोरी

ट्रान्सफार्मरमधूनच वीजचोरी

Next

पोलखोल : एबी केबल आणि आर्मर झाले बेकार
कमल शर्मा - नागपूर
वीजचोरी रोखण्यासाठी लावण्यात आलेले एबी केबल आणि आरमरचा तोड वीजचोरांनी शोधला आहे. आत थेट ट्रान्सफार्मरमधूनच (डीपी) वीज चोरी केली जात आहे. एकप्रकारे समांतर वीज वितरण प्रणाली उभी करण्यात आली आहे. कारवाई झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी नवीन तार लागतात.
लोकमत चमूने शहरातील वेगवेगळ्या भागात पाहणी करून वीजचोरी कशी होत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पारंपरिक पद्धतीने विजेच्या तारांवर हूक टाकून वीजचोरी केली जाते. परंतु या पाहणीत याचे प्रमाण कमी आढळून आले. माहिती काढली असता १५ कोटी रुपये खर्चून एबी केबल आणि आरमरचे जाळे पसरविण्यात आले आहे. त्यामुळे विजेच्या तारांवर हूक टाकून वीजचोरी करणे शक्य नाही. अशा स्थितीत वीज चोरीवर नियंत्रण मिळाले तर मग विजेची चोरी कशी होत आहे. याचे उत्तर शोधण्याच्या दृष्टीने आमची चमू उत्तर नागपुरातील झोपडपट्टीबहुल भागात पोहोचली. विटाभट्टी परिसरातील नाल्यावर तारांचे जाळे दिसून आले. या तारांचा शोध घेतला असता ते जवळच्या ट्रान्सफार्मरपर्यंत गेल्याचे दिसून आले. डीपीचे कुलुप तुटलेले होते. खाली एक तार इतर तारांशी जुळलेला होता. तेथून इतर तारांना अंडरग्राऊंड पद्धतीने नाल्याच्यावरून झोपडपट्टीपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. लोकांच्या घरी अधिकृत कनेक्शन लावण्यात आले आहे. परंतु उपयोग मात्र चोरीचा विजेचाच केला जात आहे.
यानंतर आमची चमू आॅटोमोटिव्ह चौकात पोहोचली. येथेसुद्धा थेट डीपीमधूनच वीजचोरी केली जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणी जमिनीत खड्डा खोदून जवळच्या वस्तीतील तार आणून थेट डीपीच्या फेजलाच जोडण्यात आला आहे. वस्तीतील बहुतांश घरी विजेचे कनेक्शन आहे. परंतु बहुतांश वेळा चोरीच्या विजेचाच वापर केला जातो.
सुगतनगर येथील म्हाडा कॉलनीमध्येसुद्धा उघडपणे वीजचोरी केली जात असल्याचे पाहता येते. या ठिकाणी सुद्धा थेट डीपीमधूनच वीज चोरी केली जात आहे.

Web Title: Electricity from Transformers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.