नवीन वर्षात वीज महागणार, ग्राहकांना मोठा दणका बसरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 07:52 AM2023-12-31T07:52:29+5:302023-12-31T07:53:18+5:30

नोव्हेंबरमध्येही हे शुल्क वसूल करण्यात आले. आता जानेवारीच्या वापरावरही शुल्क आकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही वसुली १० महिने सुरू राहील. हे शुल्क बीपीएल श्रेणीतील ग्राहक, तसेच कृषी ग्राहकांकडून वसूल केले जाईल.

Electricity will be expensive in the new year | नवीन वर्षात वीज महागणार, ग्राहकांना मोठा दणका बसरणार

नवीन वर्षात वीज महागणार, ग्राहकांना मोठा दणका बसरणार

नागपूर : इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना वीज महागण्याचा धोका आहे. नवीन वर्ष सुरू होण्याच्या दोनच दिवस आधी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणला या शुल्काद्वारे ग्राहकांकडून ३८५.७६ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले.  याअंतर्गत श्रेणीनिहाय लोकांना प्रतियुनिट १० ते ७० पैसे जास्त द्यावे लागतील.

नोव्हेंबरमध्येही हे शुल्क वसूल करण्यात आले. आता जानेवारीच्या वापरावरही शुल्क आकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही वसुली १० महिने सुरू राहील. हे शुल्क बीपीएल श्रेणीतील ग्राहक, तसेच कृषी ग्राहकांकडून वसूल केले जाईल. उद्योगांचे विजेचे दरही प्रतियुनिट ३० ते ४० पैशांनी वाढले आहेत.

Web Title: Electricity will be expensive in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.