राज्याच्या सीमेवर इलेक्ट्रॉनिक तपासणी

By admin | Published: July 28, 2014 04:02 AM2014-07-28T04:02:40+5:302014-07-28T04:02:40+5:30

परराज्यांना जोडणाऱ्या सीमांच्या ठिकाणी कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी २२ इलेक्ट्रॉनिक तपासणी नाके राज्य शासन सुरू करणार आहे

Electronic check-up on the state's border | राज्याच्या सीमेवर इलेक्ट्रॉनिक तपासणी

राज्याच्या सीमेवर इलेक्ट्रॉनिक तपासणी

Next

क-हाड : परराज्यांना जोडणाऱ्या सीमांच्या ठिकाणी कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी २२ इलेक्ट्रॉनिक तपासणी नाके राज्य शासन सुरू करणार आहे. त्यापैकी १३ नाक्यांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कऱ्हाड येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कर व महसूल चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कडक धोरण अवलंबिले आहे. या धोरणानुसार परराज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाके उभे करण्यात येणार आहेत. तसेच क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही हे तपासणी नाके लक्ष ठेवतील.
विविध मार्गांवरील वाढते अपघात लक्षात घेता राज्यातील ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारा इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण विभाग सुरू करणार आहे. कायद्याने या विभागाला मान्यता नाही. मात्र, अपघातांसह त्यामध्ये ठार किंवा जखमी होणारे लोक यांचेही प्रमाण अधिक असल्याने ते कमी करण्यासाठी कायद्यात बदल करून इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण विभागाला मान्यता देईल, असे सांगून ते म्हणाले, यासाठी एखादी खासगी संस्था पुढे आल्यास त्यांनाही प्राधान्य देण्याचा राज्य शासन विचार करील.
प्रशासन गतिमान व लोकाभिमुख होण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दोन वर्षांचे प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणातून चांगले अधिकारी घडतील. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही समावेश करणार आहे. तसेच इतर विभागांप्रमाणेच परिवहन विभाग राज्याला महसूल मिळवून देणारा विभाग आहे. त्यामुळे या विभागामार्फत लोकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याचा राज्य शासन प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.
नारायण राणेंनी मंत्रिपदाबरोबर प्रदेशाध्यक्षपद मागितले आहे, याबाबत विचारताच, हा निर्णय माझ्या हातात नाही, एवढेच उत्तर त्यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Electronic check-up on the state's border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.