अकोल्यातील नरराळा किल्यावर आहे ११व्या शतकातील तोफ
By admin | Published: August 24, 2016 01:03 PM2016-08-24T13:03:32+5:302016-08-24T14:59:05+5:30
अकराव्या शतकात दक्खनवर राज्य करणा-या सम्राट औरंगजेब आलमगीर याने सातपुडा पर्वत रांगेतील नरनाळा अभयारण्यात विस्तीर्ण चंदन खो-तील घनदाट जंगलात किल्ला नरनाळा येथे "नौगज तोफ" तयार केली
Next
> आशीष गावंडे
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २४ - अकराव्या शतकात दक्खनवर राज्य करणा-या सम्राट औरंगजेब आलमगीर याने सातपुडा पर्वत रांगेतील नरनाळा अभयारण्यात विस्तीर्ण चंदन खो-तील घनदाट जंगलात किल्ला नरनाळा येथे "नौगज तोफ" तयार केली. सम्राटाचा गुलाम अतु बेग याच्या मदतीने ही तोफ बनवण्यात आली.
नऊ गज म्हणजे 27 फुट लांब असून अडीच मीटर इतका बाह्य घेर व तोफेच्या आतील छिद्राचा घेर 1 मीटर पेक्षाही जास्त आहे. तोफेच्या वरच्या बाजूस पर्शीयन भाषेत एक शिलालेख कोरलेला आहे. या तोफेचा गोळा 20 मैल लांब अंतरावर जाऊन पडतो. अशी इतिहासात नोंद आहे.
ही तोफ अद्यापही सुस्थितीत आहे हे विशेष.
चारही बाजूनी विस्तीर्ण आणि घनदाट जंगलात असलेला भव्य नारनाळा किल्ला व तोफ पाहण्यासाठी पर्यटक- निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येतात.