साताऱ्यातील खंडोबा यात्रेत हत्ती बिथरला
By admin | Published: January 4, 2015 02:43 AM2015-01-04T02:43:28+5:302015-01-04T02:43:28+5:30
पालच्या खंडोबा यात्रेत शनिवारी मानाचा हत्ती बिथरल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एका महिला भाविकाचा चेंगरून मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.
महिला ठार, दोन जखमी : १५ मिनिटांचा थरार
काशीळ (जि. सातारा) : पालच्या खंडोबा यात्रेत शनिवारी मानाचा हत्ती बिथरल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एका महिला भाविकाचा चेंगरून मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.
पालच्या खंडोबा यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून दरवर्षी सहा ते सात लाख भाविक येतात. शनिवारी मुख्य दिवशी खंडोबा-म्हाळसा यांचा विवाह होणार असल्याने भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या. दुपारी दोन वाजता ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’च्या गजरात मिरवणूक सुरू झाली. भाविकांनी हत्तीवर भंडारा-खोबऱ्याची उधळण सुरू केली. याचवेळी एका भाविकाने हत्तीच्या अंगावर लोकर उधळली. लोकर डोळ्यात गेल्याने हत्ती बिथरला. त्यात चेंगरल्याने अंजना कांबळे (६५) या महिलेचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
पाल येथील श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर येथील मृत अंजना कांबळे यांच्या वारसांना दीड लाखाची मदत जाहीर करण्यात आली.
च्हत्ती बिथरल्याने गोंधळ सुरू झाला. भाविक सैरावैरा धावू लागले. त्यामुळे नेमके काय झाले याची कोणालाच कल्पना येत नव्हती. १५ ते २० मिनिटे हा गोंधळ सुरू होता.
च्यानंतर मानकऱ्यांनी आजूबाजूची गर्दी बाजूला सारत हत्तीला शांत केले. नंतर औंधचा ‘मोती’ नावाचा हत्ती सहभागी करून खंडोबा - म्हाळसा विवाह सोहळा पार पडला.