एलिव्हेटेड प्रकल्प लटकलेलाच

By admin | Published: April 5, 2017 02:20 AM2017-04-05T02:20:32+5:302017-04-05T02:20:32+5:30

लोकल सेवेवरील ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर वांद्रे ते विरार एलिव्हेटेड (उन्नत) प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे

Elevated project hangs | एलिव्हेटेड प्रकल्प लटकलेलाच

एलिव्हेटेड प्रकल्प लटकलेलाच

Next

मुंबई : लोकल सेवेवरील ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर वांद्रे ते विरार एलिव्हेटेड (उन्नत) प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे, परंतु एलिव्हेटेड प्रकल्पाला अजूनही हवी तशी गती मिळत नसून, प्रकल्प राज्य शासन दरबारीच ‘गटांगळ््या’ घेत आहे. या प्रकल्पासाठी राज्याचा अर्थ विभाग व एमएमआरडीएकडून सूचना व अन्य अभ्यास अहवाल येणे अपेक्षित आहे, परंतु महिनाभरापासून सुरू असलेले अधिवेशन यामुळे अहवालही आलेला नाही. परिणामी, राज्य सहकार्य करारही लटकला आहे.
एलिव्हेटेड प्रकल्पालाच समांतर असलेला कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो प्रकल्प आणि एलिव्हेटेड प्रकल्पाला मिळत नसलेली जागा पाहता, चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्प अडकून पडला होता. त्यामुळे हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्याचा निर्णय घेत, प्रथम वांद्रे-विरार एलिव्हेटेड प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. त्यानंतर, प्रकल्पाला जोड म्हणून वांद्रे ते चर्चगेट प्रकल्प पूर्ण केला जाईल. या प्रकल्पात एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ), रेल्वे व राज्य सरकार भागीदार आहेत. प्रकल्पांचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर केले जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात १ हजार ५२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी जमीन संपादनासह रेल्वे मार्गाच्या आखणीसाठीही खर्च केला जाईल. भूसंपादनासाठी जवळपास ७00 ते ८00 कोटी रुपये खर्च येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून कामांसाठी टप्प्याटप्प्यात निधी उपलब्ध केला जात आहे़ शासनाकडून मात्र उपेक्षाच आहे़ अर्थ विभाग व एमएमआरडीएकडून प्रकल्पांसाठी काही सूचना येणे बाकी आहेत. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रेल्वेचा अभ्यास अहवाल सांगतो...
आठ डब्यांची एसी लोकल धावणार
पहाटे ५ पासून सेवा सुरू होताच, १९ तास सेवा सुरूराहील.
एका लोकलचा स्थानकावर थांब्याचा वेळ ३0 सेकंद.
>प्रकल्पाला उशीर
एलिव्हेटेड प्रकल्पाचे काम २0१७ साली सुरू करून, ते २0२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु २0१७ मधील तीन महिने उलटूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. २0२२ साली प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तो सेवेत आल्यावर, सुरुवातीला ७ लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केल्यानंतर, त्याची क्षमता १० वर्षांनी वाढत जाईल. नंतरच्या १० वर्षांत जवळपास एकूण ९ लाख ३0 हजार प्रवासी प्रवास करतील आणि दर १० वर्षांनी दोन ते अडीच लाख प्रवाशांची त्यात भर पडत जाईल, असा अहवाल होता़.
>वांद्रे ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पातील नवी स्थानके
>स्थानकेस्थानकांचा प्रकार
वांद्रेसमांतर
वांद्रे टर्मिनसभूमिगत
सांताक्रूझभूमिगत
विलेपार्लेभूमिगत
अंधेरीभूमिगत
जोगेश्वरीसमांतर
गोरेगावएलिव्हेटेड
मालाडएलिव्हेटेड
कांदिवलीएलिव्हेटेड
बोरीवलीभूमिगत
दहिसरएलिव्हेटेड
मीरा रोडसमांतर
भार्इंदरएलिव्हेटेड
नायगावसमांतर
वसई रोडएलिव्हेटेड
नालासोपाराएलिव्हेटेड
विरार (दक्षिण)एलिव्हेटेड
विरार (उत्तर)समांतर

Web Title: Elevated project hangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.