पुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:53 AM2018-11-06T06:53:31+5:302018-11-06T06:53:43+5:30

दिवाळीचे जोरदार स्वागत केले जात आहे. त्यातच आणखी एक आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर येईल.

 Eleven days before Diwali next year | पुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर

पुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर

Next

मुंबई : दिवाळीचे जोरदार स्वागत केले जात आहे. त्यातच आणखी एक आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर येईल.
७ नोव्हेंबरला बुधवारी लक्ष्मी-कुबेरपूजन आहे. या दिवशी लक्ष्मी-कुबेरपूजनास शुभमुहूर्त सायंकाळी ६-०२ पासून रात्री ८-३५ पर्यंत आहे. गुरुवार बलिप्रतिपदेला सकाळी ६.४३ ते ८.०८ शुभ, सकाळी १०.५८ ते १२.२३ चल, दुपारी १२.२४ ते १.४८ लाभ, दुपारी १.४९ ते ३.१३ अमृत आणि सायं. ४.३८ ते ६.०१ शुभ या चौघडीत वहीपूजन, लेखन प्रारंभ करा, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तर, पुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर येईल. रविवार, २७ आॅक्टोबरला नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन एकाच दिवशी आहे, असे सोमण म्हणाले.

Web Title:  Eleven days before Diwali next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी