अकरावी आॅनलाईन प्रवेश, ७० हजार विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी

By admin | Published: July 21, 2016 09:58 PM2016-07-21T21:58:27+5:302016-07-21T21:58:27+5:30

अकरावी आॅनलाईन प्रवेशाच्या घोळामुळे हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या चिंतेत आहेत. चौथ्या फेरीअखेर अजूनही ७० हजार विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी प्रवेश

Eleven online admissions, special rounds for 70 thousand students | अकरावी आॅनलाईन प्रवेश, ७० हजार विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी

अकरावी आॅनलाईन प्रवेश, ७० हजार विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - अकरावी आॅनलाईन प्रवेशाच्या घोळामुळे हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या चिंतेत आहेत. चौथ्या फेरीअखेर अजूनही ७० हजार विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी प्रवेश घेतलेला नाही. १ लाख १३ हजार १६१ विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय पसंतीक्रम असलेले कनिष्ठ महाविद्यालय अलॉट करण्यात आले आहे. तर १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. परिणामी या विद्यार्थ्यांसाठी विशेष आॅनलाईन फेरीची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र अकरावीचे कोणतेही प्रवेश आॅफलाईन पद्धतीने होणार नाहीत; याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्णत: आॅनलाईन होत आहे. अकरावी प्रवेशाची जाहिरात २२ जुलै रोजी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. कॉलेज अलॉट करूनही प्रवेश घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयात जागा रिक्त असल्यास या महाविद्यालयांकडे संपर्क साधण्यासह एसएमएस पाठविणे आणि मूळ लॉगिनचा संदेश २५ जुलैपर्यंत पाठवण्यात येईल. अलॉट झालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयाला संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अपलोडिंग २८ जुलैपर्यंत करावे लागणार आहे. 


आॅनलाईन प्रवेशाची पाचवी फेरी...
ज्या विद्यार्थ्याने अर्ज भरलेले नाहीत. किंवा अर्धवट अर्ज भरले आहेत. शिवाय अ‍ॅलोकशन झालेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन प्रवेशाची पाचवी फेरी होणार आहे.
प्रवेश अर्ज सादर करणे - ३० जुलै ते २ आॅगस्ट
गुणवत्ता यादी जाहीर करणे - ४ आॅगस्ट
संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे - ५ आणि ६ आॅगस्ट

पसंतीचे कॉलेज मिळवण्याची संधी...
ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे. ज्यांनी विषय चुकीचा निवडलेला आहे. ज्यांना शाखा बदलयाची आहे. शिवाय ज्यांचा प्राधान्यक्रम चुकला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठीही विशेष प्रवेश फेरी असणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शिवाय एटीकेटीचे विद्यार्थी आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठीही याचा फायदा होईल. मात्र, यासाठी ९ ते ११ आॅगस्ट दरम्यान नव्याने नोंदणी करुन फी भरणे आवश्यक असल्याचे मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी म्हटले आहे.
नोंदणी करुन फी भरणे - ९ ते ११ आॅगस्ट
पहिली विशेष फेरी -९ ते १३ आॅगस्ट
दुसरी विशेष फेरी -१८ ते २३ आॅगस्ट
तिसरी विशेष फेरी -२५ ते ३० आॅगस्ट

Web Title: Eleven online admissions, special rounds for 70 thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.