अकरावीचे आॅफलाइन प्रवेश होणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:52 AM2017-08-02T04:52:40+5:302017-08-02T04:52:45+5:30
मुंबई विभागीय मंडळाने अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे कोणताही प्रवेश आॅफलाइन पद्धतीने होत नसल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी.चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : मुंबई विभागीय मंडळाने अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे कोणताही प्रवेश आॅफलाइन पद्धतीने होत नसल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी.चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
अकरावी आॅनलाइन प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झाली असून, प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आॅनलाइन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. आतापर्यंत नाव न आलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या यादीत प्रवेश मिळणार आहे. तिसºया यादीनंतर रिक्त राहिलेल्या जागांचा विचार करून, विद्यार्थ्यांना ३ आणि ४ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजेपर्यंत पसंतीक्रमात बदल करता येणार आहेत. चौथी गुणवत्ता यादी ६ आॅगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर, या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना ७ आणि ८ आॅगस्ट रोजी प्रवेश घेता येणार आहे.