नेमकं कसं आहे इयत्ता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ? जाणून घ्या..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:44 PM2019-06-19T12:44:51+5:302019-06-19T12:53:00+5:30
इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका येत्या दोन तीन दिवसांत मिळणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या ऑनलाईन निकाल दि. ८ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर बहुतेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. २१) केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजल्यानंतर त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
शुन्य फेरी
* दि. १९ ते २४ जून : कला, वाणिज्य व विज्ञान तसेच द्विलक्षी विषय व एचएसव्हीसी शाखेसाठी - अ. भाग १ न भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरणे
ब. भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग २ भरणे
* दि. १९ ते २९ जून (सायं. ५ वाजेपर्यंत) : १. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी - अ. भाग १ न भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरणे
ब. भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग २ भरणे
२. कोटा प्रवेश (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक) कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारणे आणि कोटा प्रवेशातील गुणवत्ता याद्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रदर्शित करणे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश वेळेत अपडेट करणे बंधनकारक आहे.
* दि. २६ जून (सायं. ६ वाजेपर्यंत) : द्विलक्षी विषयाची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. २७ व २८ जून (स. ११ ते ५) : द्विलक्षी विषयातील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
* दि. १ जुलै (स. ११ वा.) : सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. २ व ३ जुलै (स. ११ ते ५) : त्रुटी व हरकतींवर आक्षेप शिक्षण उपसंचालक कार्यालयात नोंदविणे
पहिली फेरी
* दि. ६ जुलै (सायं. ६ वा.) : पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. ८ व ९ जुलै (स. ११ ते ५ वाजेपर्यंत ) आणि दि. १० जुलै (स. ११ ते ३) : पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे
* दि. १० जुलै (सायं. ७ वा.) : पहिल्या गुणवत्ता यादीची कट आॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा प्रसिध्द करणे
* दि. ११ व १२ जुलै (स. ११ ते ५) : प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे आणि आवश्यकता भासल्यास भाग २ मध्ये बदल करणे
..........
दुसरी फेरी
* दि. १५ जुलै (सायं. ६ वा.) : दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. १६ व १७ जुलै (स. ११ ते ५ वाजेपर्यंत ) आणि दि. १८ जुलै (स. ११ ते ३) : दुसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे
* दि. १८ जुलै (सायं. ७ वा.) : दुसºया गुणवत्ता यादीची कट आॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा प्रसिध्द करणे
* दि. १९ व २० जुलै (स. ११ ते ५) : प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे आणि आवश्यकता भासल्यास भाग २ मध्ये बदल करणे
तिसरी फेरी
* दि. २३ जुलै (सायं. ६ वा.) : तिसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. २४ व २५ जुलै (स. ११ ते ५ वाजेपर्यंत ) आणि दि. २६ जुलै (स. ११ ते ३) : तिसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे
* दि. २६ जुलै (सायं. ७ वा.) : तिसºया गुणवत्ता यादीची कट आॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा प्रसिध्द करणे
* दि. २७ व २८ जुलै (स. ११ ते ५) : प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे आणि आवश्यकता भासल्यास भाग २ मध्ये बदल करणे
विशेष गुणवत्ता फेरी
* दि. ३१ जुलै (सायं. ६) : विशेष गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. १ व २ आॅगस्ट (स. ११ ते ५) : विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे
* दि. ३ आॅगस्ट (स. १० वा.) : उपलब्ध रिक्त जागा प्रसिध्द करणे
.........
विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी सुचना -
१. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.
२. महाविद्यालयातील ७० टक्के प्रवेश निश्चित झाल्यानंतर महाविद्यालयातील अध्यापन सुरू होईल
३.जादा तासिका, प्रात्यक्षिक घेऊन अभ्यासक्रम पुर्ण करून घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांची राहील
४. इन हाऊस, व्यवस्थापन कोट्यातील जागा स्वेच्छेने समर्पित करण्यासाठी संकेतस्थळावर वेळोवेळी सुचना देण्यात येईल.
५. महाविद्यालयातील अल्पसंख्याक कोट्यातील जागा स्वेच्छेने तिसºया गुणवत्ता यादीनंतर समर्पित करता येतील.
६. द्विलक्षी विषयाचे व अन्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश दिलेल्या कालावधीत आॅनलाईन अपडेट करणे बंधनकारक आहे.