अकरावीची दुसरी यादी जाहीर

By admin | Published: July 4, 2016 08:37 PM2016-07-04T20:37:16+5:302016-07-04T20:37:16+5:30

अकरावी आॅनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. यावेळी कला शाखेचा कट आॅफ ९४ टक्क्यांवर गेला असून,

Eleventh eleven list released | अकरावीची दुसरी यादी जाहीर

अकरावीची दुसरी यादी जाहीर

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४  : अकरावी आॅनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. यावेळी कला शाखेचा कट आॅफ ९४ टक्क्यांवर गेला असून, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा कट आॅफही ९२ टक्क्यांवर स्थिरावला आहे.
दुसऱ्या यादीत ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
त्यात नव्याने अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ हजार ४६८ इतकी आहे. पहिल्या यादीत नाव आल्यानंतर प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांमुळे प्रथम पसंतीचे महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या यादीत बेटरमेंटचा पर्याय उपलब्ध झाला होता. त्यानुसार दुसऱ्या यादीत ३७ हजार ०३९ विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळालेले आहे.

शिवाय आणखी १० हजार ८०३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. तर ६ हजार ८२९ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि ५ हजार ४२५ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश आॅनलाईन रद्द करायचा आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, पहिल्या यादीतील प्रवेश रद्द केल्यानंतर दुसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

त्यासाठी विद्यार्थ्यांना ५, ७ व ८ जुलै हा तीन दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आले नसेल, त्यांनी पुढच्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.

त्या विद्यार्थ्यांनाही मिळाला प्रवेश
दादर येथील बंद पडलेल्या शारदा मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव तांत्रिक
चूकीमुळे आॅनलाईन यादीत राहिले होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना
पहिल्या गुणवत्ता यादीत हे महाविद्यालय निश्चित झाले. प्रत्यक्षात
महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण
झाले होते. याप्रकरणाची तातडीने दखल घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने
संबंधित विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत पात्रतेनुसार इतर
महाविद्यालयांत प्रवेश मिळवून दिला.

दुसऱ्या गुणवत्ता यादीमधील बोर्डनिहाय व शाखानिहाय प्रवेश निश्चित
झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या -
बोर्ड कला वाणिज्य विज्ञान एकूण
एसएससी ३,०५६ ३५,९७२ १७,१३९ ५६,१६७
सीबीएसई १३० ३८४ ५९८ १,११२
आयसीएसई २०२ ७५२ ६९२ १,६४६
आयबी ० ० ० ०
आयजीसीएसई ४० १०१ ८५ २२६
एनआयओएस ३६ १०७ ०५ १४८
इतर १५ १२५ ६८ २०८

Web Title: Eleventh eleven list released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.