अकरावीचा प्रवेश आॅनलाइनच

By admin | Published: June 17, 2015 04:07 AM2015-06-17T04:07:39+5:302015-06-17T04:07:39+5:30

करावीच्या सर्व जागा आॅनलाईननेच भरा, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले. मॅनेजमेंट कोट्यासाठी राखीव

The eleventh entrance is online | अकरावीचा प्रवेश आॅनलाइनच

अकरावीचा प्रवेश आॅनलाइनच

Next

मुंबई : अकरावीच्या सर्व जागा आॅनलाईननेच भरा, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले. मॅनेजमेंट कोट्यासाठी राखीव असलेल्या जागा सोडून इतर जागा आॅनलाईनेच भरा. आॅनलाईन प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर
जागा शिल्लक राहिल्यास त्याची नव्याने जाहिरात द्या व त्याही जागा आॅनलाईनेच भरा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, असे सरकारी वकील दिनेश खैरे यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.
आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत दोष असल्याने यात बदल करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुण्यातील वैशाली बाफना यांनी केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. (प्रतिनिधी)

सरकार म्हणे, प्रक्रिया पारदर्शक
याची दखल घेत न्यायालयाने या प्रवेश प्रक्रियेत बदल करा, अशी सूचना करत याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शासनाला मार्च महिन्यात दिले होते. मात्र ही प्रक्रिया कशी पारदर्शक आहे, हे पटवून देणारे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात सादर केले.

कोट्याचे प्रवेश कधी भरायचे?
-पुण्यातील वैशाली बाफना यांच्या याचिकेवर मंगळवारी खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात अ‍ॅड. खैरे यांनी या नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात असल्याचे न्यायालयाला सांगितले.
-गेल्यावर्षी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत शिल्लक राहिलेल्या जागा शासनाने मॅनेजमेंट कोट्याला दिल्या व शिल्लक जागा भरल्या गेल्या, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले.
-तसेच मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश कधी व कसे भरणार याचेही आदेश शासनाने संबंधित महाविद्यालयांना द्यावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी २ जुलैला होणार आहे.

Web Title: The eleventh entrance is online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.