अकरावी प्रवेशप्रक्रिया गुरुवारी सुरू

By admin | Published: May 23, 2017 05:34 AM2017-05-23T05:34:59+5:302017-05-23T05:34:59+5:30

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रिया येत्या गुरुवारपासून

The eleventh entrance process will start on Thursday | अकरावी प्रवेशप्रक्रिया गुरुवारी सुरू

अकरावी प्रवेशप्रक्रिया गुरुवारी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रिया येत्या गुरुवारपासून (दि. २५) सुरू होणार आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेची विक्री विद्यार्थ्यांना सर्व शाळांमधून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला भाग येत्या २५ मेपासूनच भरता येईल, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे गेल्या काही वर्षांपासून पुण्यात आॅनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. शिक्षण विभागातर्फे यंदा पुण्यासह राज्यातील आणखी काही प्रमुख शहरांत आॅनलाईन पद्धतीने अकरावीचे प्रवेश केले जाणार आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी माहिती पुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करून प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन टेमकर यांनी केले आहे.
अकरावी प्रवेश अर्जाचे दोन भाग करण्यात आले असून पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती भरायची आहे. येत्या २५ मेपासून पुढे आणखी काही दिवस पहिला भाग भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
प्रवेश अर्जाचा केवळ एक भाग भरणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. दुसऱ्या भागात महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरल्यानंतरच संबंधित महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल.

प्रवेश अर्ज भरताना घ्यायची काळजी
आपल्या शाळेतून / मार्गदर्शन केंद्रावरून माहिती पुस्तिका खरेदी करा.
नमुना अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
माहिती पुस्तिकेमध्ये लॉग-इन आयडी आणि पासवर्ड दिलेले आहे.
आपल्या शाळेत जाऊन प्रवेशप्रक्रिया समजून घ्यावी. http://pune.11thadmission.net  या वेबसाईटवर जा.
लॉग-इन करण्यासाठी माहिती पुस्तिकेमध्ये दिलेला लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरा.
पासवर्ड बदला आणि पुढच्या वेळेस लॉग-इन करण्यासाठी लक्षात ठेवावा.
सिक्युरिटी प्रश्न निवडून त्याची योग्य उत्तरे लक्षात ठेवा.
सिक्युरिटी प्रश्न व पासवर्ड याची प्रिंट घ्या.
संगणकावर दिलेल्या सूचना पाळून टप्प्याटप्प्याने आॅनलाईन अर्ज भरा.
दहावीच्या परीक्षेचा बैठक क्रमांक टाकल्यावर विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती आपोआप येईल.
अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना स्वत: सर्व माहिती भरावी लागेल.
सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतून प्रवेश अर्जाचा पहिला भाग अचूक भरून अ‍ॅप्रूव्हल घ्यावे.
अर्ज अ‍ॅप्रुवल झाल्यानंतरच प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येईल.
विद्यार्थ्यांनी ‘कन्फर्म’ या बटनावर क्लिक करून आपला अर्ज निश्चित करावा.
विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आपल्या शाळेकडून प्रमाणित करून घ्यावीत.
पहिल्या भागातील माहिती भरून झाल्यावर कन्फर्म बटणावर क्लिक करावे.
कन्फर्म झालेला अर्ज शाळेचे मुख्याध्यापक / मार्गदर्शन केंद्रांमार्फत (अ‍ॅप्रुव्ह) करून घ्यावा.
अ‍ॅप्रुव्ह केलेल्या अर्जाची प्रिंट घ्यावी व ती जपून ठेवावी.

-आॅनलाईन अर्ज : लॉगइन आयडी, पासवर्ड मिळणार
1पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या http://www.dydepune.com  या संकेतस्थळावर अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी शाळांमधून माहिती पुस्तिका विकत घेतल्यानंतर त्यांना पुस्तिकेबरोबर लॉगइन आयडी व पासवर्ड दिला जाईल. त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहे.

2विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील शिक्षकांच्या मदतीने आॅनलाईन अर्ज भरायचा आहे. विद्यार्थी व पालकांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरण्यासाठी विनाकारण पैसे खर्च करू नयेत, असे आवाहन दिनकर टेमकर यांनी केले आहे.

Web Title: The eleventh entrance process will start on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.